vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ कार्यक्रमाचे अनावरण

उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ कार्यक्रमाचे अनावरण

 

 (जिल्हा परिषद, ठाणे) – भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ठाणे जिल्ह्यातील मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ आज, दि. २६ जानेवारी, २०२६ रोजी साकेत पोलीस मैदान, ठाणे येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला असून या मुख्य शासकीय ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन भरारी’ या अभिनव शैक्षणिक उपक्रमाचे औपचारिक अनावरण करण्यात आले.

*मिशन भरारी अंतर्गत ग्रामीण विद्यार्थ्यांना विमानवारीची संधी*

मिशन भरारी उपक्रमांतर्गत ठाणे जिल्हा परिषद शाळांतील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विमानप्रवासाचा अनुभव देण्यात येणार आहे. या उपक्रमाचा उद्देश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवणे, शैक्षणिक गुणवत्ता उंचावणे तसेच विज्ञान व आधुनिक तंत्रज्ञानाबाबत जिज्ञासा निर्माण करणे हा आहे.या उपक्रमांतर्गत इयत्ता पाचवी, सहावी, सातवी व आठवी या वर्गांतील विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी, गणित, विज्ञान व समाजशास्त्र या विषयांच्या केंद्र, तालुका व जिल्हास्तरावर स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात येणार आहेत. या स्पर्धा परीक्षांमधून जिल्हास्तरावर निवड झालेल्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी फेब्रुवारी व मार्च २०२६ दरम्यान देशातील नामांकित वैज्ञानिक केंद्रांना शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात येणार असून, या सहलीदरम्यान विद्यार्थ्यांना विमानवारी करण्याची संधी मिळणार आहे.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना वैज्ञानिक संशोधन, अवकाश विज्ञान, आधुनिक प्रयोगशाळा व नव्या तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष माहिती मिळणार असून, त्यांच्या भविष्यातील शैक्षणिक वाटचालीस नवी दिशा मिळणार आहे.

याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे तसेच विविध मान्यवर, अधिकारी, शिक्षकवर्ग व कर्मचारी उपस्थित होते.

मान्यवरांनी मिशन भरारी उपक्रमाचे कौतुक करत, या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या क्षमतेला नवे क्षितिज मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

000

संबंधित पोस्ट

मुठा नदीवरील धोकादायक पूल कायमस्वरूपी बंद; वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश

समाधान समारोह 2026 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयातील विशेष लोकअदालत 21, 22 व 23 ऑगस्टला- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अदिती उदय कदम- सहभागासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 मे 2026

गोरठा येथे चारा टंचाईच्या वृत्ताची प्रत्यक्ष पाहणीत पडताळणीगोशाळेत पुरेशा प्रमाणात कडबा व सोयाबीन कुटार उपलब्ध  वस्तुस्थितीची पडताळणी करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

सेवा_संकल्प_अभियानसडावाघापूर येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत विविध दाखल्यांचे वाटप

vishwatmaklokswamivarta

महिला व चिमुकला बेपत्ता; धाड पोलिसांकडे मिसिंग दाखल

राज्यात सातत्याने बदलणारे हवामान आणि अनिश्चित पावसामुळे पीक उत्पादनावर मोठा परिणाम, पीक पद्धतीचा सखोल अभ्यास करून त्याचा अहवाल शासनाला सादर करावा, असे निर्देश कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले

vishwatmaklokswamivarta