vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे प्रितीसंगमावर दिवंगत यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे प्रितीसंगमावर दिवंगत यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन

 

सातारा प्रतिनिधी: उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज कराड येथील प्रितीसंगमावर महाराष्ट्राचे शिल्पकार आणि पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर, खासदार सुनील तटकरे, खासदार नितीन पाटील, माजी खासदार श्रीनिवास पाटील, माजी आमदार बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, कराडचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच कराड येथे येऊन दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन पुष्पचक्र अर्पण केले.

०००

संबंधित पोस्ट

इयत्ता दहावी, बारावी परीक्षेसाठीलातूर विभागीय मंडळाची हेल्पलाईन आणि समुपदेशन सुविधा…

vishwatmaklokswamivarta

मंगळागौर स्पर्धेतून संस्कृतीचा सोहळा व नारीशक्तीचा जागर – महापौर श्रीम.सुजाता पाटील

विधानपरिषद निवडणूक मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

हिवरापहाडीच्या चिमुकल्यांच्या ‘बॉटल माईक’ रिपोर्टिंगची उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून दखल· दुर्गम भागातील शाळेत शिक्षक रुजू· “आम्हाला अधिकारी व्हायचंय, तुम्ही फक्त शिक्षक द्या…” मुलींच्या ‘त्या’ हाकेनंतर उपमुख्यमंत्री कार्यालयातून चक्रे हलली· जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे तात्काळ पाऊल; शिक्षक शिवाजी जोगदंड यांची हिवरापहाडी शाळेत नियुक्ती

vishwatmaklokswamivarta

पावसाळी हंगामात मांडवा-गेटवे प्रवासी जलवाहतूक २६ मे ते ३१ ऑगस्टदरम्यान सेवा राहणार बंद 

जलजागृती पंधरवड्यानिमित्त साई एन्जेल स्कूलमध्ये जलप्रतिज्ञा