vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

२ रे वैदर्भीय आंबेडकरी महिला संमेलन अध्यक्षपदी डॉ. रेखा मेश्राम यांची निवड 

२ रे वैदर्भीय आंबेडकरी महिला संमेलन अध्यक्षपदी डॉ. रेखा मेश्राम यांची निवड

छत्रपती संभाजीनगर / प्रतिनिधी सावित्रीमाई फुले स्मृतिदिन, जागतिक महिला दिन व प्रा. सतेश्वर मोरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित २ रे वैदर्भीय आंबेडकर महिला संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. रेखा मेश्राम यांची निवड करण्यात आली आहे.

हे संमेलन दि. ८ मार्च २०२६ (जागतिक महिला दिन) रोजी नेर, जि. यवतमाळ येथे संपन्न होणार आहे. या संमेलनाचे उद्घाटन संस्थापक सदस्य दलित पँथर, आंबेडकरोत्तर आंबेडकरी चळवळीचे इतिहासकार व विचारवंत ज.वि. पवार यांच्या हस्ते होणार आहे.

प्रा. डॉ. रेखा मेश्राम या रमाई फाऊंडेशनच्या अध्यक्षा आहेत. रमाई फाऊंडेशनच्या माध्यमातून त्या रमाई महिला चळवळीचे साहित्य संमेलन दरवर्षी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यात आयोजित करतात. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित आहेत. त्या रमाई मासिकाच्या संपादक आहेत. रमाई मासिक हे केवळ महिलांसाठी चालविले जाणारे मासिक आहे. या मासिकाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये अनेक महिला लिहित्या करून कवी, लेखक म्हणून पुढे आणल्या आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

संबंधित पोस्ट

वरळी येथील दूरदर्शन केंद्रात प्लॅनेट रीड ‘मराठी समान भाषा उपशीर्षक केंद्रा’चा शुभारंभ माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव व महासंचालक ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला

vishwatmaklokswamivarta

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी १५ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करा सन २०२४-२५ व २०२५-२६ या वर्षांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू व साहसी उपक्रमांतील व्यक्तींना आवाहन

vishwatmaklokswamivarta

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते अजितदादा पवार देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे नामकरणशाश्वत विकासाची उद्दिष्टे डोळ्यासमोर केंद्राचे बळकटीकरण करा -उपमुख्यमंत्री

१० लाख रुपयांची मदत बँक खात्यात जमा; मॅनहोल दुर्घटनेतील दिवंगत असलम शेख यांच्या पत्नीकडून पत्र लिहून महानगरपालिकेचे आभार-श्रीमती अंजुम शेख यांनी महापौरांप्रति व्यक्त केली कृतज्ञता

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील उद्योजकांचे प्रश्न मार्गी लावण्यास प्राधान्य- जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- उद्योग विभागाच्या समित्यांच्या आढावा बैठकीत दिली ग्वाही- एनएबीएल टेस्टिंग लॅब प्रकल्पात अधिकाधिक उद्योजकांनी सहभागी होण्याचे आवाहन- उद्योगांना पीएनजी गॅस पुरवठ्याची कार्यवाही 15 दिवसात करण्याचे निर्देश

महाबळेश्वर येथे सेवा संकल्प अभियान अंतर्गत कायदेविषयक व योजनांची जनजागृती

vishwatmaklokswamivarta