vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

कामगार भवनात कामगारांसाठींच्या सेवा एकाच छताखाली – पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर कामगार भवनचे भूमिपूजन

कामगार भवनात कामगारांसाठींच्या सेवा एकाच छताखाली – पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर-कामगार भवनचे भूमिपूजन

परभणी, प्रतिनिधी : कामगार भवनच्या माध्यमातून कामगार वर्गाला सर्व प्रशासकीय सेवा एकाच छताखाली तत्परतेने मिळतील. या भवनामुळे कामगार कल्याण मंडळाच्या विविध योजना, नोंदणी प्रक्रिया, लाभांचे वितरण, आरोग्य सेवा, सुरक्षा उपाययोजना तसेच इतर कल्याणकारी कार्यक्रम अधिक सुटसुटीत, पारदर्शक आणि कार्यक्षम पद्धतीने राबविता येतील, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण, पाणी पुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केले.

परभणी शहरात आज कामगार भवन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन पालकमंत्री यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.कार्यक्रमास जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, कामगार आयुक्त एच.पी. तुम्मोड, पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कोरे, सरकारी कामगार अधिकारी टी. ई. कराड, उपविभागीय अभियंता बी.एम. शिंदे आदी उपस्थित होते.पालकमंत्री साकोरे – बोर्डीकर म्हणाल्या की, कामगार भवनाची नवी इमारत ही परभणी जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. राज्य शासनाच्यावतीने सर्वसामान्य कष्टकरी कामगारांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबविल्या जातात. कामगारांच्या कुटूंबांना उत्तम शिक्षण, आरोग्य सुविधा मिळण्यासाठी सहाय्य केले जाते. कामगारांचे जीवनमान उंचविण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून परभणी जिल्ह्यात कामगार भवन उभारले जात आहे. कामगार विभागाची नवीन इमारत पूर्ण झाल्यावर कामगार वर्गासाठी सुसज्ज कार्यालय उभारले जाईल आणि या कार्यालयातून कामगारांना उत्तम सेवा मिळतील आणि या विभागाचे काम अधिक गतिमान व सुलभ होईल.

कामगार भवनाकरीता एकूण 0.11 गुंठे जागा उपलब्ध करुन देण्यात आली असून 14 कोटी 58 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. ही इमारत तीन मजली असणार आहे. यामध्ये अंतर्गत फर्निचर, बागबगीचा, संरक्षण भिंत, अग्निरोधक यंत्रना, अंतर्गत बाह्य विद्युतीकरण व अनुषांगिक बाबी राहणार आहेत.

०००

 

संबंधित पोस्ट

साताऱ्यात महिला शक्तीचा जागर; जागतिक महिला दिनानिमित्तमहिला अधिकारी-कर्मचाऱ्यांची भव्य बाईक रॅली

भरती परीक्षा पद्धती सुधारणा उच्चस्तरीय समिती सोमवारी छत्रपती संभाजीनगरला; विद्यार्थी, पालक व तज्ज्ञांशी साधणार संवाद

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात; मुंबईकरांचे सहकार्य आणि प्रशासकीय यंत्रणेचे काम कौतुकास्पद : मंत्री मंगलप्रभात लोढा

जागतिक दर्जाचे मनुष्यबळ तयार करणे आणि स्वयंरोजगाराला प्रोत्साहनासाठी शासन तत्पर -कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा महाराष्ट्र राज्य कौशल्य स्पर्धेचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

गणेशोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्राची समृद्ध परंपरा जागतिक पातळीवर पोहोचेल    — पर्यटन मंत्री शंभूराज देसाई  विविध देशांच्या वाणिज्यदूतांनी मुंबईतील गणपतीचे घेतले दर्शन

vishwatmaklokswamivarta

राहुरी विधानसभा पोटनिवडणूक-मतदार ओळखपत्र नसल्यास १२ पर्यायी कागदपत्रे चालणार