vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

घृष्णेश्वर मंदिर परिसर विकास कामांबाबत सर्व विभागांनीउपाययोजना संयुक्तपणे राबवाव्या- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

घृष्णेश्वर मंदिर परिसर विकास कामांबाबत सर्व विभागांनीउपाययोजना संयुक्तपणे राबवाव्या- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी कुंभमेळाच्या पार्श्वभुमिवर वेरुळ येथील घृष्णेश्वर मंदिर परिसरात विविध विकासकामे राबवावयाची आहेत. या सर्व विभागांनी आपल्या विभागामार्फत करावयाच्या विकासकामांसंदर्भात उपाययोजना संयुक्तपणे राबवाव्या,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले

वेरुळ येथील घृष्णेश्वर मंदिर परिसर विकास आराखड्याच्या अंमलबजावणी संदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड,उपविभागीय पोलीस अधिकारी अपराजिता अग्निहोत्री, उपजिल्हाधिकारी संगिता राठोड, पुरातत्व विभागाचे शिवकुमार भगत, पोलीस निरीक्षक डी. आर. फराटे आदी उपस्थित होते.

कुंभमेळ्यानिमित्त प्रत्यक्ष पर्वणी सुरु होण्याच्या आत नियोजीत विकास आराखड्यानुसार कामे सुरु करण्यात येणार आहेत. त्यासाठी पूर्वतयारी म्हणून सर्व संबंधित विभागांनी उपाययोजना राबविण्यास सुरुवात करावी. त्यात मंदिर परिसरातील अतिक्रमणे काढण्याबाबत ग्रामपंचायतमार्फत उपाययोजना व्हाव्या. त्यासाठी महसूल, पोलीस व पुरातत्व विभागाने संयुक्त मोहीम राबवावी. संबंधित अतिक्रमणधारकांना नोटीस बजावण्यात यावी. त्यासाठी संबंधित अतिक्रमणधारकांशी स्थानिक प्रशासनाने बोलावे,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.

०००००

संबंधित पोस्ट

कोटगल येथे साथ फाउंडेशन व सार्वजनिक वाचनालयातर्फे शिवजयंती निमित्त प्रतिमा पूजन

कृषी निविष्ठा संनियंत्रण समिती बैठक,शेतकऱ्यांना बियाणे,खते वेळेत उपलब्ध करा-जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

हिंदु जनजागृती समिती आणि वारकरी संप्रदायाच्या लढ्याला मोठे यश!*वादग्रस्त ‘ईठ्ठला’ नाटकातील संतांची नावे आणि आक्षेपार्ह भाग वगळण्याचे सेन्सॉर बोर्डाचे आदेश!नाटकाचे नाव बदलून सुधारित संहिता पुन्हा सादर करण्याचे सेन्सर बोर्डाचे निर्मात्यांना स्पष्ट निर्देश*

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याचा प्रारंभ !पाणी वापराच्या योग्य नियोजनासाठी जनजागृती आवश्यक – जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड

दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, चारा छावण्या व रोजगार हमीची कामे सुरू करा : खासदार डॉ. कल्याण काळे,पीक परिस्थिती आढावा बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधले; पीकविम्यासाठी पूर्वीची पोर्टल प्रणाली सुरू करण्याची मागणी

vishwatmaklokswamivarta

आपले सरकार पोर्टलसंबंधी प्रशिक्षणाचे आज आयोजन