vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

शुक्रवारी माहूर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय प्लेसमेंट ड्राईव्ह व रोजगार मेळावा 

शुक्रवारी माहूर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय प्लेसमेंट ड्राईव्ह व रोजगार मेळावा

नांदेड प्रतिनिधी:- जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड व हिरकणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, माहूर यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार 27 मार्च 2026 रोजी हिरकणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, माहूर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय प्लेसमेंट ड्राईव्ह/रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्लेसमेंट ड्राईव्ह /रोजगार मेळाव्यामध्ये विविध खाजगी आस्थापनामध्ये रोजगार व नोकरीच्या संधी साठी मुलाखती घेण्यात येणार असून जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी शुक्रवार 27 मार्च 2026 सकाळी 10 वा. पासून हिरकणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, माहूर येथे उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांनी केले आहे.

अधिक माहिती व संपर्कासाठी मा. सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, आनंदनगर रोड, बाबानगर नांदेड ईमेल आयडी nandedrojgar01@gmail.com दूरध्वनी क्रमांक 02462-251674 व सोनल मात्रे 8830807312 वर संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता सहायक आयुक्त डॉ. रा. म. कोल्हे यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

सुशिक्षित बेरोजगारांनी जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजनेसाठी अर्ज करावेत

vishwatmaklokswamivarta

अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई मोठे उद्योग-रिलायन्स कन्झ्युमर प्रॉडक्ट्स, रिलायन्स रिटेल, ब्लिंकिट आणि झोमॅटो हायपरप्युअर या कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह १० जणांविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे

vishwatmaklokswamivarta

करिअर समुपदेशन सत्रातून विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध संधींची ओळख

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे बुधवारी (दि.२५) रोजगार मेळावा

इंडिया स्किल्स स्पर्धेमध्ये कौशल्य दाखविण्याची युवकांना संधी६३ कौशल्य प्रकारांचा समावेश; जिल्ह्यातील युवकांनी नोंदणी करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

महाजिओटेक’मध्ये सेवानिवृत्त शासकीय अधिकाऱ्यांसाठी संधी· इच्छुकांना अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta