vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

एमएच-सीईटी परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश 

एमएच-सीईटी परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

नांदेड प्रतिनिधी:- एमबीए/एमएमएस या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशांसाठी एमबीए /एमएमएस-सीईटी-2026 आणि अभियांत्रिक, औषधनिर्माणशास्त्र, बी प्लॅनिंग व कृषी तंत्रज्ञान या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएच-सीईटी परीक्षा-2026 दोन टप्प्यात नांदेड शहरात 6 ते 26 एप्रिल 2026 या कालावधीत सकाळी 7.30 ते सायं. 6.45 वाजेपर्यत व 9 ते 19 मे 2026 या कालावधीत सकाळी 7.30 ते सायं 6.45 या वेळेत 3 परीक्षा केंद्रावर घेण्यात येत आहे.

परीक्षा केंद्राच्या परिसरात बाहेरील व्यक्तींचा उपद्रव होऊ नये व परीक्षा स्वच्छ सुसंगत पार पाडण्याच्यादृष्टिने या परीक्षा केंद्र परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी काढले आहेत.

ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ पंचशिलनगर, तिरुमला हॉस्पीटल, छत्रपती चौक, नांदेड, शासकीय तंत्रनिकेतन वीर सावरकर मार्ग बाबानगर, नांदेड, श्री. संभाजी कॉलेज ऑफ प्रायमरी, शामल एज्युकेशन कॅम्प देगाव रोङ पो. नांदला डिग्रस खडकुत या 3 या परीक्षा केंद्रापासून 100 मीटर परिसरात दिनांक 6 ते 26 एप्रिल 2026 या कालावधीत सकाळी 7.30 ते 6.45 वाजेपर्यत व 9 ते 19 मे 2026 पर्यत सकाळी 7.30 ते सायं. 6.45वाजेपर्यतच्या कालावधीत सकाळी 6 ते रात्री 7 वाजेपर्यंत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीला कॅलक्युलेटर, ट्रान्झिस्टर, रेडिओ, लॅपटॉप इ. तत्सम साहित्य परीक्षा केंद्राच्या 100 मीटरपर्यंत परिसरात वापरण्यास व जवळ बाळगण्यास तसेच परीक्षा केंद्रास नेण्यास, त्याचप्रमाणे परीक्षा कालावधीत या परिसरात 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वी, फॅक्स, झेरॉक्स, पेजर आणि ध्वनीक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

गौरी-गणपती विसर्जनासाठी-कोकणातून मुंबई-पुण्याकडे परतणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी एसटीच्या रत्नागिरी विभागाकडून आठवडाभरात २,५०७ जादा बसगाड्या सोडण्याचे नियोजन

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने 2029 पर्यंत नशामुक्त भारत घडवण्यासाठी आखला मार्गदर्शक आराखडा

vishwatmaklokswamivarta

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील उमेदवारांच्या खर्चाची दुसरी तपासणी पूर्ण

सन्मान कर्तृत्वाचा’ सोहळा उत्साहातमाजी आमदार व्ही. यू. डायगव्हाणे, प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे यांचा जीवनगौरव पुरस्काराने सपत्नीक सन्मान

vishwatmaklokswamivarta

लातूर जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज…

vishwatmaklokswamivarta

आयआयएमसी’ची एमए आणि पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू; ई-समुपदेशनासाठी नोंदणीची अंतिम तारीख 7 जून 2026 तीन नवीन विशेष एमए अभ्यासक्रमांमुळे आयआयएमसीच्या सहा शैक्षणिक परिसरांमधील अभ्यासक्रमांमध्ये वाढ