vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञानप्रदेशस्थानिक बातम्या

डिजिटल जनगणना 2027′ च्या तयारीला वेग; जिल्हास्तरीय क्षेत्रीय प्रशिक्षण संपन्न-जनगणनेचे कार्य अचूकपणे पूर्ण करा- डॉ. प्रवीणकुमार देवरे

‘डिजिटल जनगणना 2027’ च्या तयारीला वेग; जिल्हास्तरीय क्षेत्रीय प्रशिक्षण संपन्न-जनगणनेचे कार्य अचूकपणे पूर्ण करा- डॉ. प्रवीणकुमार देवरे

 बुलढाणा प्रतिनिधी: जनगणना 2027 च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात प्रशासकीय तयारीने वेग घेतला आहे. यावेळची जनगणना पूर्णपणे कागदविरहित आणि डिजिटल पद्धतीने पार पडणार असून, ही माहिती भविष्यातील भारताची अर्थव्यवस्था बळकट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. त्यामुळे नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणाद्वारे तांत्रिक बाबी सखोल समजून घेऊन जनगणनेचे कार्य अचूकपणे पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी दिले.

जिल्हा नियोजन सभागृह आणि जिजाऊ सभागृह येथे जिल्हास्तरीय क्षेत्रीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण दोन बॅचेसमध्ये आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाचा समारोप 8 एप्रिल रोजी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांच्या उपस्थितीत झाला, यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनीही प्रशिक्षणास उपस्थित राहून मार्गदर्शन केले. जनगणनेचे काम करताना कोणतीही त्रुटी राहू नये आणि प्रक्रियेत पारदर्शकता राखली जावी, यावर त्यांनी विशेष भर दिला. कर्मचाऱ्यांनी डिजिटल साधनांचा प्रभावी वापर करावा, डेटा संकलनाची पद्धत नीट समजून घ्यावी आणि फिल्डवर काम करताना येणाऱ्या अडचणींवर तात्काळ उपाययोजना कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले.

या मोहिमेअंतर्गत 81 फिल्ड ट्रेनर्सना चार मास्टर ट्रेनर्समार्फत प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणादरम्यान प्रत्यक्ष कामाचा अनुभव येण्यासाठी ग्रामीण भागातील येळगाव ता. जि. बुलढाणा व शहरी भागातील बुलढाणा येथील राम नगर या भागात काही घरांना भेटी देऊन प्रत्यक्ष जनगणनेची प्रात्यक्षिके करून दाखवण्यात आली. यावेळी जनगणना संचालनालयाचे पवन घोडे व मयूर पवार (सांख्यिकी अन्वेषक ग्रेड II), मास्टर ट्रेनर संजय खडसे उपविभागीय अधिकारी, सिंदखेड राजा आणि डॉ. रामेश्वर पुरी उपविभागीय अधिकारी, खामगाव यांच्यासह सर्व क्षेत्रीय प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

प्रशिक्षणाच्या समारोप प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी सुरेश कव्हळे, तहसीलदार संजीवणी मुपडे, आणि नायब तहसीलदार प्रमोद करे यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वांनी समन्वयाने आणि जबाबदारीने हे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

0000

संबंधित पोस्ट

एमपीएससीकडून राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६ साठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम व बीज भांडवल कर्ज योजना 100 टक्के उद्दिष्टपूर्ती*

हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५० वा शहीदी समागम कार्यक्रम;शाळास्तरावर दि.१५ पासून जनजागृतीसाठी विविध उपक्रम..

vishwatmaklokswamivarta

पुणे–मुंबई एक्सप्रेस वे’ वरील अपघातामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन सेवेच्या १३९ फेऱ्या रद्द वाहतूक सुरळीत होताच बससेवा टप्प्याटप्प्याने पूर्ववत होणार

vishwatmaklokswamivarta

बोव्हाईन ब्रिडींग ऍक्टची प्रभावी अंमलबजावणी करा आयुक्त पशुसंवर्धन डॉ. किरण पाटील यांचे निर्देश

पहिल्याच तिमाहीत ४३४ कोटींच्या मालमत्ता कर संकलनाव्दारे नवी मुंबईने महसूल व्यवस्थापनात नोंदविला नवा इतिहास*अदायगीच्या ऑनलाइन सुविधांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; डेटा विश्लेषण आणि तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरामुळे ऐतिहासिक यश*