vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

राजर्षी शाहूंना कृतज्ञ अभिवादन : ट्रस्टतर्फे दसरा चौकात पुष्पांजली

राजर्षी शाहूंना कृतज्ञ अभिवादन : ट्रस्टतर्फे दसरा चौकात पुष्पांजली

कोल्हापूर, प्रतिनिधी : कोल्हापूर येथील राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त दसरा चौकातील ऐतिहासिक पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. विजय रोठोड यांच्या हस्ते पुष्पांजली अर्पण करण्यात आली. गेली ४५ वर्षे ट्रस्टच्या स्थापनेपासून दरवर्षी हा अभिवादनाचा उपक्रम सातत्याने राबविला जात असून, राजर्षींच्या सामाजिक विचारांना अभिवादन करण्याची परंपरा जपली जात आहे.

यावेळी ट्रस्टचे विश्वस्त पोलीस अधीक्षक नोलोत्पल, विश्वस्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, विश्वस्त शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी तथा ट्रस्टचे सदस्य सचिव गजानन गुरव, विश्वस्त डॉ. अशोक चौसाळकर, विश्वस्त तथा जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, प्रशासन अधिकारी राजदीप सुर्वे आणि व्यवस्थापक डी. एम. नांगरे, पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील, उपस्थित होते. दसरा चौकातील अभिवादनानंतर शाहू स्मारक येथे अर्धाकृती पुतळ्यालाही पुष्प अर्पण करण्यात आले. तसेच त्या ठिकाणी ट्रस्टच्या कामकाजाबाबत चर्चा व येणाऱ्या जयंती दरम्यान आयोजित केल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमांची चर्चा झाली.

सन १९८१ मध्ये स्थापन झालेल्या राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टमार्फत राजर्षी शाहू महाराजांची जयंती व पुण्यतिथी निमित्त विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांचा प्रसार, कोल्हापूर पर्यटनाला चालना तसेच साहित्य, कला, संस्कृती आणि शिक्षण क्षेत्रातील कार्याला प्रोत्साहन देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ट्रस्टच्या माध्यमातून सातत्याने केले जात आहे. कार्यक्रमानंतर सर्व उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शाहू समाधी स्थळाला भेट देऊन त्यांच्या कार्याला अभिवादन केले.

 

00000

संबंधित पोस्ट

समुद्रकिनाऱ्यांवरील पर्यटकांच्या सुरक्षेसाठी गस्त वाढवा; बचाव यंत्रणा सक्षम करा- पालकमंत्री भरत गोगावले,धोकादायक ठिकाणी सूचना फलक लावा; बीचवर जीवरक्षक, प्रशिक्षित आपदा मित्र आणि आवश्यक बचाव साहित्य उपलब्ध करा

vishwatmaklokswamivarta

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर,छत्रपती संभाजीनगर, अमरावती विभागातील पिकांच्या स्थितीची करणार प्रत्यक्ष पाहणी; शेतकऱ्यांशी साधणार संवाद

vishwatmaklokswamivarta

कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा हा #पर्यटन जिल्हा असून जिल्ह्यातील चिपी विमानतळावरून चिपी- मुंबई, मुंबई-चिपी ही विमान सेवा जलदगतीने सुरु व्हावी- मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक-2026 99.78 टक्के मतदान, आठ पैकी सात केंद्रावर शंभर टक्के मतदान

श्री मुंबई गुर्जर कडिया सेवा समाज, बोरिवली यांच्यातर्फे शरद पौर्णिमा महोत्सव २०२६ उत्साहात साजरा-१५०० हून अधिक नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग; पारंपरिक रास-गरबा आणि दांडियाने रंगत वाढवली..

vishwatmaklokswamivarta

वाहन हस्तांतरण व ना हरकत प्रमाणपत्रासाठी आधार प्रमाणीकरणाची सुधारित प्रक्रिया..