vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

अशोक कांबळे यांच्या हत्येचा तिव्र निषेध – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*  

अशोक कांबळे यांच्या हत्येचा तिव्र निषेध – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

मुंबई द प्रतिनिधी – रिपब्लिकन पक्षाच्या ठाणे शहर जिल्हा युवक कमिटीचे सरचिटणीस अशोक कांबळे यांच्यावरती जीवघेणा हल्ला करुन त्यांचा झालेल्या हत्येचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही तिव्र निषेध करीत आहोत. दिवंगत अशोक कांबळे यांच्या मारेक-यांना त्वरीत अटक करुन कठोरात कठोर शिक्षा केली पाहिजे अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केली.  ना. रामदास आठवले हे दिवंगत रिपब्लिकन कार्यकर्ते अशोक कांबळे यांच्या कुटुंबियांची लवकरच सांत्वनपर भेट घेणार आहेत. रिपब्लिकन वतीने दिवंगत अशोक कांबळे यांना जाहीर श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.

 दिवंगत अशोक कांबळे रिपब्लिकन पक्षाचे ठाणे शहर जिल्हयातील युवा कार्यकर्ते होते. त्यांनी अनेक सामाजिक कार्यक्रमात भाग घेतला होता. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे आयोजन ते करीत होते. राम नगर ठाणे येथे त्यांच्या कामाचे कार्य होते. रिपब्लिकन कार्यकर्ता म्हणून त्यांची चांगली ओळख होती. त्यांच्यावर अचानक भ्याड हल्ला करुन त्यांची हत्या झाल्याची घटना अत्यंत दुःखद आणि मनाला वेदना देणारी आहे. त्यांच्या झालेल्या हत्येचा आपण रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तिव्र निषेध करीत आहोत. तरी प्रशासनाने सर्व मारेक-यांना त्वरीत अटक करुन गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा केली पाहिजे अशी मागणी ना. रामदास आठवले यांनी केली आहे.

00000

संबंधित पोस्ट

पर्यावरणपूरक प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव साजरा करताना श्रीमूर्ती विसर्जनासाठी 170 कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती,मा.न्यायालयाच्या निर्देशानुसार 6 फूटांपर्यंतच्या श्रीमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

मालाड येथील आकाशवाणी (प्रसार भारती) च्या जागेवर जागतिक दर्जाचा ‘एकात्मिक चित्रपट आणि दूरदर्शन मीडिया हब’ उभारण्यासाठी मान्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्ह्यातील 187 गावांमध्ये ‘जन भागिदारी अभियान’Ø 18 ते 25 मे या कालावधीत विविध उपक्रम व शिबिरांचे आयोजन

ठाण्यात पुन्हा रंगणार गरब्याचा महासोहळा ! ‘रास-रंग ठाणे २०२६’ची जय्यत तयारी  ११ ऑक्टोबरपासून दहा रात्री ठाणेकर थिरकणार  नैतिक नागदा, एन २ बँडसह नामवंत गायकांची पर्वणी, विशेष मुलांसाठी व ठाणे मनपा विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र गरबा…

vishwatmaklokswamivarta

मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड प्रमाणपत्र सुपूर्द

पाणीटंचाई निवारणासाठी सज्ज राहा; अवैध पाणी उपशावर कठोर कारवाई करा – जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांचे निर्देश● पाणीटंचाई व्यवस्थापनाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा● जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश● पाणीगळती दुरुस्ती, वॉटर हार्वेस्टिंग आणि शेततळ्यांच्या कामांना प्राधान्य

vishwatmaklokswamivarta