vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ‘पुतळा समितीची’ आढावा बैठक संपन्न

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ‘पुतळा समितीची’ आढावा बैठक संपन्न

जालना, प्रतिनिधी जिल्ह्यातील पुतळे आणि स्मारकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आज ‘पुतळा समिती’ची आढावा बैठक पार पडली. यावेळी बैठकीस जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल तसेच विविध संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बैठकीत मुख्यत्वे जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक पुतळ्यांच्या परिसरातील कायदा, सुव्यवस्था आणि सुरक्षिततेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. संवेदनशील ठिकाणांवर विशेष पोलीस गस्त ठेवण्याबाबत तसेच सीसीटीव्ही (CCTV) यंत्रणा प्रभावीपणे कार्यान्वित करण्याबाबत पोलीस अधीक्षकांशी चर्चा झाली.
जिल्हाधिकारी यांनी महापुरुष आणि क्रांतीकारकांच्या पुतळ्यांच्या परिसराची नियमित स्वच्छता, रंगरंगोटी व योग्य देखभाल राखण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना तातडीने आवश्यक सूचना देण्याचे निर्देश दिले. याशिवाय, कोणत्याही ठिकाणी नियमांचे उल्लंघन करून किंवा विनापरवाना पुतळे उभारले जाणार नाहीत, याची दक्षता प्रशासनाने घेण्याचे आदेशही जिल्हाधिकारी यांनी दिले.
बैठकीत प्रशासनाने पुतळ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करत असल्याचे स्पष्ट केले असून, नागरिकांनी देखील या नियमांचे पालन करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

राजभाषा हिंदीच्या उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी संरक्षण मंत्रालयाला ‘राजभाषा कीर्ती पुरस्कार २०२५-२६’ पटकावले प्रथम स्थान

vishwatmaklokswamivarta

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीच्या शासनातर्फे करण्यात येणा-या पूर्वतयारीचा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतला आढावा

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

कृषी पायाभूत सुविधांसाठी एक हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीच्या संधी- पणन मंत्री जयकुमार रावल‘मॅग्नेट ॲग्रीबिझनेस इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टर मीट’चे पणनमंत्री रावल यांच्या हस्ते दिमाखदार उदघाटन

vishwatmaklokswamivarta

२० व २१ जून रोजी ‘स्पेशल ऑनलाईन प्लेसमेंट ड्राईव्ह’; १० वी पास ते पदवीधरांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी

अमरावती आयटीआयमध्ये सोमवारी शिकाऊ उमेदवार भरती मेळावा