vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाच्या नागपूर आयुक्त पदाची संदीप देशमुख यांनी घेतली शपथ

महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाच्या नागपूर आयुक्त पदाची संदीप देशमुख यांनी घेतली शपथ

मुंबई, प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त मनु कुमार श्रीवास्तव यांनी संदीप जगन्नाथ देशमुख यांना महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाच्या नागपूर आयुक्त पदाची तसेच गोपनीयतेची शपथ दिली.
मंत्रालयासमोरील नवीन प्रशासन भवनाच्या ७ व्या मजल्यावरील महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाच्या कार्यालयात शपथविधी सोहळा संपन्न झाला. यावेळी कोकण विभागाचे आयुक्त बलदेव सिंग, अमरावती विभागाचे आयुक्त अरुण डोंगरे उपस्थित होते. तसेच दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे छत्रपती संभाजीनगर विभागाचे आयुक्त डॉ. किरण जाधव, नाशिक विभागाच्या आयुक्त चित्रा कुलकर्णी आणि पुणे विभागाचे आयुक्त सुधाकर तेलंग सहभागी झाले होते.
संदीप देशमुख हे अपर आयुक्त तथा विशेष निबंधक सहकारी संस्था (सेवानिवृत्त) म्हणून कार्यरत होते. त्यांच्या प्रदीर्घ प्रशासकीय अनुभवाचा लाभ आयोगाच्या कार्याला होणार असल्याचे मुख्य आयुक्त श्रीवास्तव यावेळी म्हणाले.
जनतेच्या अधिकारांचे संरक्षण करणे, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमच्या अंमलबजावणी संदर्भात क्षत्रीय अधिकाऱ्यांवर देखरेख ठेवणे, त्यांना मार्गदर्शन करणे तसेच कामकाजाचा आढावा घेणे ही राज्य सेवा हक्क आयुक्त पदाची मोठी जबाबदारी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
राज्यपाल जिष्णु वर्मा यांनी मनु कुमार श्रीवास्तव यांना संदीप जगन्नाथ देशमुख यांना राज्य सेवा हक्क आयुक्त, नागपूर पदाची शपथ देण्यासाठी प्राधिकृत केले होते.
माजी राज्य सेवा हक्क आयुक्त, पुणे दिलीप शिंदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी आयोगाच्या सचिव वैशाली राज चव्हाण उपस्थित होत्या.
0000

संबंधित पोस्ट

देशाला ‘संपन्न ऊर्जा’ राष्ट्र बनविण्यासाठी महाराष्ट्राचे बळ मिळणार**मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*राज्य शासनाचा अणुऊर्जा निर्मितीसाठी कंपन्यांशी सामंजस्य करार*२५, ४०० मेगावॅट अणुऊर्जा व १,२३,५०० रोजगार निर्मिती**एकूण गुंतवणूक ६,५०,००० कोटी*

भराडखेड्यात भव्य भराडखेडा प्रीमियर लिग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख रुपम घुगे यांच्यासह हस्ते नाणेफेक करुन स्पर्धेला सुरुवात

बारामती विधानसभा पोटनिवडणुकरिता २३ एप्रिल २०२६ रोजी मतदान होणार आहे. मतदारांना आपला मतदानाचा हक्क निर्भय व सुलभरीत्या बजावता यावा, यासाठी मतदारांना भरपगारी सुट्टी जाहीर

कारागृहातील बंदीवानांसाठी ‘सहाय्यक योग प्रशिक्षक’ कौशल्य प्रशिक्षणास प्रारंभ

सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक !गोवा येथील सनातन आश्रमाला नाणीजधाम येथील जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांची सदिच्छा भेट,सात्त्विकता आणि संघटन हीच राष्ट्राच्या उत्कर्षाची गुरुकिल्ली ! – अनंत विभूषित जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिका पाणीपुरवठा विषयक महत्त्वाची सूचना..

vishwatmaklokswamivarta