vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

वनार्टी तर्फे मोफत प्रशिक्षण; ऑनलाईन अर्ज भरण्यास १५ जूनपर्यंत मुदतवाढ

‘वनार्टी तर्फे मोफत प्रशिक्षण; ऑनलाईन अर्ज भरण्यास १५ जूनपर्यंत मुदतवाढ

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी)- राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत कार्यरत असलेली वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था, नागपूर (वनार्टी)तर्फे २०२६-२८ या शैक्षणिक सत्रासाठी जेईई, नीट आणि एमएचटी-सीईटी परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास दि.१५ जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे,असे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत वावगे यांनी कळविले आहे. राज्यातील विमुक्त जाती तसेच भटक्या जमाती ब, क व ड नॉन-क्रिमीलेअर प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासासाठी वनार्टी ही संस्था कार्य करीत आहे.

सन २०२६-२८ या शैक्षणिक सत्रासाठी ‘वनार्टी’तर्फे जेईई, नीट आणि एमएचटी-सीईटी परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन प्रशिक्षण दिले जाणार आहे. राज्यातील ३६ जिल्ह्यांतील पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांचे अर्ज ‘वनार्टी’च्या www.vanarti.in या संकेतस्थळावर मागविण्यात आले आहेत. अर्ज भरण्यासाठी अंतिम मुदत ३० मे २०२६ निश्चित करण्यात आली होती. मात्र, विद्यार्थ्यांनी ‘वनार्टी’च्या ७८८७८८२०२६ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या मोठ्या प्रतिसादाची दखल घेत आता अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ जून २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे,असे कळविण्यात आले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

राज्यातील 5 शहरांना शहर स्वच्छतेसाठी मार्गदर्शक शहर म्हणून नवी मुंबईची प्रभावी कामगिरी-‘स्वच्छ सर्वेक्षण’ अंतर्गत ‘स्वच्छ शहर जोडी’ उपक्रम..

ग्रामीण महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये अजित पवारांचा मोठा वाटा- विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विधानपरिषदेत श्रद्धांजली अर्पण; सदस्यांनी आठवणींना दिला उजाळा

गोदा ते नर्मदा यात्रा : दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी जलसंवर्धनाचा संकल्प – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील धुळेकरांनी केले गोदा ते नर्मदा जलयात्रेचे जल्लोषात स्वागत

मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरील घाटाला मिळणार बायपास; ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे १ मेला उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली मिसिंग लिंकचा कामाची पाहणी

अनु.जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी २.० अर्ज प्रक्रिया सुरूनवीन ‘महाआयडी’ अनिवार्य; अर्ज प्रलंबित न ठेवण्याच्या महाविद्यालयांना सूचना..

माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाच्या जनजागृतीसाठी ‘कसं काय?’ मोहिमेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ