vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात स्वच्छ व पिण्यायोग्य पाणीपुरवठा…

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात स्वच्छ व पिण्यायोग्य पाणीपुरवठा…

 

        नवी मुंबई प्रतिनिधी  नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबे मुख्य जलवाहिनीवरील सुधारणा करण्याच्या कामासाठी महानगरपालिका क्षेत्रामध्ये दि. 13 मे 2026 व दि. 14 मे 2026 असे दोन दिवस शटडाऊन घेण्यात आलेला होता. हे काम पूर्ण झाल्यानंतर दि. 15 मे 2026 पासून पाणी पुरवठा सुरळीत झालेला आहे. तथापि शटडाऊनच्या काळात पाईपलाईन बंद असल्याने तो सुरू झाल्यानंतर काही भागात एक दिवस गढुळ पाणी पुरवठा झाला होता. मात्र त्यानंतर आता स्वच्छ पाणी पुरवठा सुरू झालेला आहे.

          तथापि काही प्रसारमाध्यमांमध्ये याबाबत आलेल्या बातम्यांच्या अनुषंगाने जुईनगर येथील अपोलो सोसायटी व त्या लगतच्या सोसायट्यांमध्ये विभागातील अभियंतांनी तेथील रहिवाशांसोबत पाणी नमुने तपासून घेतले आहेत व ते पिण्यायोग्य असल्याचे आढळले आहे. या सोसायटीमधील रहिवाश्यांनीही शटडाऊननंतर एक दिवस गढुळ पाणी आले होते व त्यानंतर स्वच्छ पाणी पुरवठा होत असल्याचे सांगितले तसेच सद्यस्थितीत गढुळ पाण्याची तक्रार नसल्याचे सांगितले. अशाचप्रकारे नेरूळ, सानपाडा व इतर क्षेत्रातही पाणी नमुने तपासणी करण्यात आली व पाणी नमुने स्वच्छ व पिण्यायोग्य असल्याचे आढळून आले.

          त्यास अनुसरून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामधील नागरिकांना सूचित करण्यात येते की, सद्यस्थितीत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये स्वच्छ व पिण्यायोग्य पाणी पुरवठा होत आहे याची नोंद घेण्यात यावी व याबाबत काही तक्रार असल्यास संबंधित विभाग कार्यालयात अथवा 1800222309 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

 

संबंधित पोस्ट

गडचिरोलीत रंगणार ‘कोया कृषी कुंभ’* *जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आयोजनाचा आढावा*

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार 2025 15 मार्चपर्यंत प्रवेशिका सादर करण्याची अंतिम मुदत

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील उमेदवारांच्या खर्चाची दुसरी तपासणी पूर्ण

पालघर मध्ये प्रस्तावित प्रकल्पांविरोधात जनआक्रोश, वाढवण बंदरासह विविध प्रकल्पांना विरोध; ५६ संघटनांचा भूमिपुत्रांच्या आंदोलनाला पाठिंबा

vishwatmaklokswamivarta

स्वित्झर्लंडमधील ‘दावोस’मध्ये गोव्याच्या ‘दैवी कणां’ची भुरळ; विज्ञानाला न उलगडणारे कोडे जागतिक पटलावर

पुणे विभाग पदवीधर व पुणे विभाग शिक्षक मतदार संघांच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज.मतमोजणी प्रक्रिया अधिकारी- कर्मचाऱ्यांनी समन्वयाने अचूक, शांततेत यशस्वी करावी- विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले

vishwatmaklokswamivarta