vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

अमृत संस्थेमार्फत पर्यटन क्षेत्रातील उद्योजकांसाठी उद्योजकता कौशल्य विकास कार्यक्रमाचे आयोजन

अमृत संस्थेमार्फत पर्यटन क्षेत्रातील उद्योजकांसाठी उद्योजकता कौशल्य विकास कार्यक्रमाचे आयोजन

नांदेड प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या अमृत संस्थेमार्फत राबविण्यात येत असलेल्या “अमृत पर्यटन” उपक्रमांतर्गत पर्यटन क्षेत्राशी संबंधित उद्योजक, व्यावसायिक व नवउद्योजकांसाठी उद्योजकता कौशल्य विकास कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी नोंदणी सुरु असून लाभार्थी हा अमृतच्या लक्षित गटाचा असावा अशी महत्वाची सूचना जिल्हा व्यवस्थापक सौरभ संतोष माळहिप्परगेकर यांनी दिली आहे.

अमृत पर्यटन हा महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी, स्थानिक रोजगार निर्मिती वाढविण्यासाठी तसेच पर्यटनाशी संबंधित उद्योजकांना सक्षम करण्यासाठी राबविण्यात येणारा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. या उपक्रमाद्वारे राज्यातील पर्यटन स्थळे, पर्यटन सेवा, स्थानिक उत्पादने व पर्यटन व्यवसायांना नवीन संधी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे.

पर्यटन क्षेत्र हे देशातील सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या क्षेत्रांपैकी एक असून, या क्षेत्रात व्यवसाय विस्तार, रोजगार निर्मिती व आर्थिक प्रगतीच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. या संधींचा लाभ अधिकाधिक उद्योजकांना मिळावा आणि त्यांना आधुनिक व्यवसाय व्यवस्थापन कौशल्ये प्राप्त व्हावीत, या उद्देशाने या विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात टूर्स अँड ट्रॅव्हल्स व्यवसायिक, टुरिस्ट गाईड, कुक आणि केटरर्स, होमस्टे व रिसॉर्ट संचालक, पर्यटन सेवा पुरवठादार, धार्मिक व सांस्कृतिक पर्यटनाशी संबंधित उद्योजक तसेच पर्यटन क्षेत्रात नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणारे युवक-युवती सहभागी होऊ शकतात.

कार्यक्रमादरम्यान सहभागी उद्योजकांना व्यवसाय उभारणी व विस्तारासाठी आवश्यक मार्गदर्शन, प्रभावी व्यवसाय नियोजन, आधुनिक विपणन तंत्रज्ञान, डिजिटल मार्केटिंग, ग्राहक व्यवस्थापन, आर्थिक नियोजन, ब्रँडिंग, पर्यटन क्षेत्रातील नवीन व्यावसायिक संधी तसेच शासनाच्चे विविध उपक्रम व सहाय्याबाबत सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.

तसेच अनुभवी तज्ज्ञ व क्षेत्रातील यशस्वी उद्योजकांकडून प्रत्यक्ष अनुभवाधारित मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार असून, सहभागी उद्योजकांना पर्यटन व्यवसाय अधिक प्रभावीपणे विकसित करण्यासाठी आवश्यक दिशा व मार्गदर्शन मिळणार आहे.

अमृत पर्यटन अंतर्गत पर्यटन क्षेत्रात स्वयंरोजगाराला प्रोत्साहन व प्रशिक्षण देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या आहेत. या उपक्रमाचा लाभ पर्यटन क्षेत्रातील संबंधित सर्व उद्योजक,

व्यावसायिक आणि इच्छुक युवक-युवतीनी घ्यावा असे आवाहन आयोजनकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी अमृत नांदेड जिल्हा कार्यालय, अष्टविनायक नगर, कॅनाल रोड, तरोडा नाका नांदेड (7391065472/8600240032/7083868522) वर संपर्क साधावा असेही कळविले आहे. 00000

संबंधित पोस्ट

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व प्रादेशिक व्यवस्थापक यांच्या उपस्थितीत आरसेटी नांदेडमध्ये प्रेरणादायी दिवस

करदात्यांना सुलभता प्राप्त व्हावी विभागाकडून विविध सुविधा : सहआयुक्त सौ. रंजना देशमुख 9 वा वस्तू व सेवा कर (जीएसटी) दिन 1 जुलै 2026 

पशुपालकांसाठी सुवर्णसंधी: ‘पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड’ अंतर्गत ३ लाखांपर्यंत अर्थसहाय्य

ग्राहकांनी सजग राहून सुरक्षित व्यवहाराची सवय अंगीकारावी – न्यायाधीश सय्यद सादिक अली तहसील कार्यालयात जागतिक ग्राहक दिन उत्साहात संपन्न

अमृत’ संस्थेतर्फे खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी मोफत ‘ड्रोन पायलट’ प्रशिक्षण

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे जेम पोर्टल व ई-टेंडरिंग प्रशिक्षण कार्यक्रम