vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

डॉ. आनंदीबाई जोशी मुलींचे आयटीआय येथे प्रवेश सुरू 

डॉ. आनंदीबाई जोशी मुलींचे आयटीआय येथे प्रवेश सुरू

अकोला, प्रतिनिधी : महिलांना कौशल्याधारित व रोजगाराभिमुख प्रशिक्षण देणा-या अकोल्यातील डॉ. आनंदीबाई जोशी मुलींचे आयटीआय येथे प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. केवळ महिलांसाठी असलेल्या या संस्थेत महिला सक्षमीकरणासाठी अनेकविध प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जात आहेत. अभ्यासक्रमाबरोबरच निवासासाठी स्वतंत्र वसतिगृह, ग्रंथालय, दरमहा ५०० रुपये विद्यार्थीवेतन व इतर सोयी-सुविधा दिल्या जात आहेत. येथेवयोमर्यादेचे कोणतेही बंधन नसल्यामुळे सर्व वयोगटातील महिलांना कौशल्याधारित शिक्षण घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध आहे.
कॉम्प्युटर ऑपरेटर, कॉस्मेटॉलॉजी, ड्रेस मेकिंग, फॅशन डिझाईन, बेकर अँड कन्फेक्शनर, फ्रूट्स अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग, सेक्रेटरिअल प्रॅक्टिस आणि इंजिनिअरिंग अंतर्गत आयसीटीएसएम, आयडीडी व इलेक्ट्रिकल मेकॅनिक या ट्रेड्सचे प्रशिक्षण दिले जाते. या अभ्यासक्रमांमुळे महिलांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या अनेक उत्तम संधी उपलब्ध होणार आहेत.
इच्छुक उमेदवारांनी मनकर्णा प्लॉट, श्री शिवाजी महाविद्यालय मार्ग, अकोला येथील संस्थेशी थेट संपर्क साधून आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी या विनामूल्य प्रवेश प्रक्रियेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य श्री. शरदचंद्र ठोकरे यांनी केले आहे.

 

०००

संबंधित पोस्ट

शिवछत्रपतींच्या ‘शुद्धीकरण मोहिमेला’ ३५० वर्षे पूर्ण; सोलापुरात ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिना’निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन

लातूर जिल्ह्यात पुढील पाच दिवस पावसाचा ‘येलो अलर्ट’; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

जवाहर नवोदय विद्यालयातील दहावीचा निकाल 100 टक्के

राज्य-विशिष्ट कायद्यांच्या आढाव्यातून महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी ठोस शिफारशी आवश्यक – राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर महिलांच्या मालमत्ता, कृषी जमीन हक्कांसह ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांवर टीस येथे विचारमंथन

मुंबईतील लोकल फेऱ्यांची संख्या २०३० पर्यंत ३,५०० पर्यंत वाढविणार– केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव· मुंबई-सावंतवाडी एक्स्प्रेसचा शुभारंभ· गणेशोत्सवापूर्वी कोकणवासीयांना मोठी भेट

vishwatmaklokswamivarta

वोडाफोन आयडिया कंपनीवर 32 लाख रुपयांचा रायगड ग्राहक मंचात दावा दाखल…