vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पर्यटन मार्गदर्शकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम..

आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पर्यटन मार्गदर्शकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम..

 

अहिल्यानगर, प्रतिनिधी – आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर देश-विदेशातून मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविक व पर्यटकांना दर्जेदार आणि व्यावसायिक मार्गदर्शन उपलब्ध व्हावे, तसेच पर्यटन क्षेत्रात कुशल मनुष्यबळ निर्माण व्हावे, या उद्देशाने पर्यटन संचालनालयाच्या वतीने ‘पर्यटन मार्गदर्शक’ हा विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पर्यटन क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या युवक-युवतींनी तसेच पर्यटन मार्गदर्शक म्हणून कार्य करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पर्यटन संचालनालयाचे नाशिक येथील उपसंचालक यांनी केले आहे.

हा प्रशिक्षण कार्यक्रम इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टुरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट (आयआयटीटीएम), ग्वाल्हेर येथे आयोजित करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणामध्ये पर्यटन मार्गदर्शनाची मूलतत्त्वे, वारसा व सांस्कृतिक पर्यटन, पर्यटक व्यवस्थापन, संवाद कौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास, ग्राहक सेवा, पर्यटनविषयक कायदे व नियम तसेच कुंभमेळ्यासारख्या मोठ्या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये पर्यटकांना मार्गदर्शन करण्यासाठी आवश्यक कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या उमेदवारांचे प्रशिक्षण शुल्क, निवास व्यवस्था व भोजनाचा संपूर्ण खर्च पर्यटन विभागामार्फत करण्यात येणार आहे. मात्र, ग्वाल्हेर येथे येण्या-जाण्याचा प्रवास खर्च संबंधित उमेदवारांना स्वतः करावा लागणार आहे. या प्रशिक्षणामुळे पर्यटन क्षेत्रातील रोजगार व स्वयंरोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होण्यास मदत होणार असून आगामी कुंभमेळ्यात पर्यटकांना उच्च दर्जाची सेवा देण्यासाठी सक्षम पर्यटन मार्गदर्शकांची फळी तयार होणार आहे.

याबाबत अधिक माहितीसाठी महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या maharashtratourism.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी अथवा ८३९०७३१७३७ या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच उपसंचालक कार्यालय, पर्यटन भवन, शासकीय विश्रामगृह आवार, गोल्फ क्लब मैदानाजवळ, नाशिक येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा, असेही प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

 

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र शासनाचे चार, आठ आणि अकरा वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

vishwatmaklokswamivarta

परीक्षा प्रक्रियेत स्थैर्य, सुरक्षितता आणि पारदर्शकतेला प्राधान्य निश्चित वेळापत्रक, प्रश्नपत्रिका सुरक्षा, केंद्रीकृत तक्रार निवारण आणि परीक्षा केंद्रांच्या सुविधांवर भरविद्यार्थ्यांसह शिक्षक, पालक व भागधारकांशी सल्लामसलत; राज्यातून १८ हजारांहून अधिक ई-मेल्स प्राप्त…

vishwatmaklokswamivarta

46 वे विभागीय वार्षिक पुष्पप्रदर्शन 14 व 15 फेब्रुवारीला छत्रपती संभाजीनगर मध्ये….

vishwatmaklokswamivarta

आज चौथ्या दिवशीही मुंबईत बीएसटी बसचा बेमुदत संप सुरूच  बेस्ट प्रवासी हैराण…

अहिल्यानगर जनगणना मोहिमेत दोन प्रगणकांनी रचला नवा आदर्श    प्रशासनाकडून सत्कार कडक उन्हातही विक्रमी कामगिरी !

जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त ५१ गावांसाठी ५८ विंधण विहिरी व १० कुपनलिकांना प्रशासकीय मंजुरी;जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांचे आदेश; कामे ३० जूनपूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना

vishwatmaklokswamivarta