
महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियानाचे आयोजन
रायगड-अलिबाग,( प्रतिनिधी:- समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत न्याय आणि हक्क पोहोचवणे हे क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या विचारांचे मूळ सूत्र होते. शेतकऱ्यांसाठी त्यांनी केलेले काम अमिट आहे. त्यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून महसूल विभागांतर्गत प्रलंबित असलेली अर्धन्यायिक प्रकरणे जलद गतीने व तडजोडीने निपटारा करण्यासाठी महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार दि.1 सप्टेंबर 2026 ते दि 31 मार्च 2027 या कालावधीत महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी सचिन ढोले यांनी दिली
महाराष्ट्र शासन, महसूल व वनविभाग यांच्याकडील 13 ऑगस्ट 2026 चे शासन निर्णयानुसार राज्यात महसूल प्रशासनातील मंडळ अधिकारी, तहसिलदार, उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्धन्यायिक न्यायालयांमध्ये जमिनींशी संबंधित महसूली दावे मोठया प्रमाणावर दाखल होतात. प्रकरणांमध्ये एका स्तरावर निकाल लागल्यानंतर असंतुष्ट पक्षकार वरिष्ठ न्यायालयात पुन्हा अपील अथवा पुनरीक्षण अर्ज दाखल करतात, ज्यामुळे हे दावे वर्षानुवर्षे सुरु राहतात, विधी सेवा प्राधिकरणामार्फत राबविल्या जाणाऱ्या लोक अदालत धर्तीवर दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने व तडजोडीने हे महसूली दावे कायमस्वरुपी निकाली काढल्यास अर्धन्यायिक यंत्रणेवरील ताण कमी होऊन पक्षकारांची वेळेची व पैशांची बचत होईल तहसिलदार, उपविभागीय अधिकारी व अपर जिल्हाधिकारी यांचा महसूल लोक अदालत कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे
अपर जिल्हाधिकारी
महसूल अदालतीचे ठिकाण- अलिबाग तालुका अपर जिल्हाधिकारी कार्यालय,अलिबाग, अंतर्गत येणारे तालुके अलिबाग, मुरुड, पेण, महसूल अदालत दिनाक दि.05 ऑक्टोबर ते दि.07 डिसेंबर 2026. महसूल अदालतीचे ठिकाण- माणगाव तालुका उपविभागीय अधिकारी कार्यालय माणगाव, अंतर्गत येणारे तालुके माणगाव, तळा,महाड, पोलादपूर, महसूल अदालत दिनाक दि.06 ऑक्टोबर ते दि.08 डिसेंबर 2026. महसूल अदालतीचे ठिकाण- पनवेल तालुका अपर तहसिलदार कार्यालय पनवेल, अंतर्गत येणारे तालुके पनवेल, उरण, कर्जत, खालपूर, महसूल अदालत दिनाक दि.09 ऑक्टोबर ते दि.11 डिसेंबर 2026.
उपविभागीय अधिकारीमहसूल अदालतीचे ठिकाण- अलिबाग तालुका उपविभागीय अधिकारी कार्यालय,अलिबाग, अंतर्गत येणारे तालुके अलिबाग, मुरुड, महसूल अदालत दिनाक दि.05 ऑक्टोबर ते दि.07 डिसेंबर 2026. महसूल अदालतीचे ठिकाण- पेण तालुका उपविभागीय अधिकारी कार्यालय,पेण, अंतर्गत येणारे तालुके पेण, महसूल अदालत दिनाक दि.05ऑक्टोबर ते दि.07 डिसेंबर 2026. महसूल अदालतीचे ठिकाण-रोहा तालुका उपविभागीय अधिकारी कार्यालय,रोहा, अंतर्गत येणारे तालुके रोहा, सुधागड, महसूल अदालत दिनाक दि.05 ऑक्टोबर ते दि.07 डिसेंबर 2026. महसूल अदालतीचे ठिकाण- श्रीवर्धन तालुका उपविभागीय अधिकारी कार्यालय,श्रीवर्धन, अंतर्गत येणारे तालुके श्रीवर्धन, म्हसळा, महसूल अदालत दिनाक दि.05 ऑक्टोबर ते दि.07 डिसेंबर 2026. महसूल अदालतीचे ठिकाण- पनवेल तालुका उपविभागीय अधिकारी कार्यालय,पनवेल, अंतर्गत येणारे तालुके पनवेल, उरण, महसूल अदालत दिनाक दि.05 ऑक्टोबर ते दि.07 डिसेंबर 2026. दि.06 ऑक्टोबर ते दि.08 डिसेंबर 2026. महसूल अदालतीचे ठिकाण- कर्जत तालुका उपविभागीय अधिकारी कार्यालय,कर्जत, अंतर्गत येणारे तालुके कर्जत, खालापूर, महसूल अदालत दिनाक दि.05 ऑक्टोबर ते दि.07 डिसेंबर 2026. महसूल अदालतीचे ठिकाण- माणगाव तालुका उपविभागीय अधिकारी कार्यालय,माणगाव, अंतर्गत येणारे तालुके माणगाव, तळा, महसूल अदालत दिनाक दि.05 ऑक्टोबर ते दि.07 डिसेंबर 2026. महसूल अदालतीचे ठिकाण- महाड तालुका उपविभागीय अधिकारी कार्यालय,महाड, अंतर्गत येणारे तालुके महाड, पोलादपूर, महसूल अदालत दिनाक दि.05 ऑक्टोबर ते दि.07 डिसेंबर 2026.
तहसिलदार,महसूल अदालतीचे ठिकाण- तहसिलदार अलिबाग, तहसिलदार मुरुड, तहसिलदार पेण, तहसिलदार पनवेल, अपर तहसिलदार पनवेल, तहसिलदार उरण, तहसिलदार कर्जत, तहसिलदार खालापूर, तहसिलदार रोहा, तहसिलदार सुधागड, तहसिलदार माणगाव, तहसिलदार तळा, तहसिलदार महाड, तहसिलदार पोलादपूर, तहसिलदार श्रीवर्धन, तहसिलदार म्हसळा, अपर तहसिलदार माणगाव, सर्व तहसिल कार्यालयांकरिता महसूल अदालत दिनाक दि.05 ऑक्टोबर ते दि.07 डिसेंबर 2026 असा आहे.



