vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

पथविक्रेते व महिला उद्योजकांसाठी शेगाव येथे अन्नसुरक्षा प्रशिक्षणFSSAI पश्चिम विभागाचा पुढाकार; सुरक्षित अन्न हाताळणी, स्वच्छता व अन्नसुरक्षा मानकांबाबत केले जाणार मार्गदर्शन

पथविक्रेते व महिला उद्योजकांसाठी शेगाव येथे अन्नसुरक्षा प्रशिक्षणFSSAI पश्चिम विभागाचा पुढाकार; सुरक्षित अन्न हाताळणी, स्वच्छता व अन्नसुरक्षा मानकांबाबत केले जाणार मार्गदर्शन

बुलढाणा, प्रतिनिधी : भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण (FSSAI), पश्चिम विभागाच्या वतीने सेवा सप्ताहानिमित्त पथविक्रेते तसेच लघु अन्न व्यवसायांमध्ये कार्यरत महिला उद्योजकांसाठी आज, दि. २४ नोव्हेंबर २०२६ रोजी शेगाव येथे अन्नसुरक्षा प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय (SSGMCE), शेगाव येथे सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

या कार्यक्रमाला केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) तथा केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव गणपतराव जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. आमदार संजय कुटे यांचीही उपस्थिती राहणार आहे. तसेच FSSAI पश्चिम विभागाच्या संचालक प्रीती चौधरी (IRS), जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे, उपविभागीय अधिकारी रामेश्वर पुरी, तहसीलदार प्रज्ञा काकडे, शेगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी सूरज जाधव आणि श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य उपस्थित राहणार आहेत.

या प्रशिक्षण कार्यक्रमाचा मुख्य उद्देश पथविक्रेते व महिला उद्योजकांमध्ये अन्नसुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करणे आणि सुरक्षित व स्वच्छ अन्न हाताळणीच्या पद्धतींचा अवलंब करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे हा आहे. यावेळी अन्नसुरक्षा मानके, वैयक्तिक स्वच्छता, व्यवसाय परिसराची स्वच्छता, सुरक्षित अन्ननिर्मिती, अन्नपदार्थांची योग्य साठवणूक तसेच अन्नसुरक्षेशी संबंधित नियम व तरतुदींचे पालन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

लघु अन्न व्यवसाय चालविणाऱ्या व्यावसायिकांना दैनंदिन कामकाजात अन्नसुरक्षा व स्वच्छतेचे निर्धारित निकष पाळता यावेत, यासाठी आवश्यक ज्ञान आणि व्यावहारिक कौशल्ये या प्रशिक्षणातून दिली जाणार आहेत. सुरक्षित अन्न व्यवसाय पद्धतींचा अवलंब, ग्राहकांचा विश्वास वृद्धिंगत करणे आणि नागरिकांना अधिक सुरक्षित व आरोग्यदायी अन्न उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

‘ईट राईट इंडिया’ अभियानाची उद्दिष्टे साध्य करण्यासोबतच अन्नसुरक्षेबाबत जनजागृती करणे आणि लघु अन्न व्यावसायिकांची क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने FSSAI पश्चिम विभागाने हा उपक्रम हाती घेतला आहे. पथविक्रेते व महिला उद्योजकांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

0000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्रातील शेतीमध्ये महिलांचे योगदान अत्यंत मोलाचे – अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी कृषी विभाग-एम.एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन आयोजित चर्चासत्रात महिला शेतकरी केंद्रस्थानी

vishwatmaklokswamivarta

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सावंतवाडी उपविभागीय कार्यालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन संपन्न सावंतवाडी उपविभागीय कार्यालयासाठी ४.३३ कोटींचा निधी

महाराजस्व अभियानातून शासकीय योजना लोकांच्या दारात – पालकमंत्री डॉ. अशोक वुईके कोरपना येथे आयोजन ; लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्रांचे वाटप

केंद्र सरकार आणत असलेल्या एफसीआरए या दुरुस्ती विधेयकाला विरोध खासदार सुप्रिया सुळे

जालना जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा आनंदी अय्यर यांना पुरस्कार 

ठाणे महानगरपालिकेचा 44 वा वर्धापन दिन 1 ऑक्टोबर रोजी· राम गणेश गडकरी रंगायतन येथे अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम विविध क्षेत्रातील मान्यवरांचा ‘ठाणे भूषण’, ‘ठाणे गौरव’ व ‘ठाणे गुणीजन’ व ‘विशेष’ पुरस्काराने होणार गौरव

vishwatmaklokswamivarta