ठाणे जिल्ह्यात मुंब्रा परिसरात १ कोटी ३० लाख रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केली असून या प्रकरणी एकाला अटक
ठाणे प्रतिनिधी-ठाणे जिल्ह्यात मुंब्रा इथे १ कोटी ३० लाख रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केली असून या प्रकरणी एकाला अटक केली आहे.
या प्रकरणी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही दारू वाहून नेणारा ट्रक जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावर पारसिक रेतीबंदर भागात अडवण्यात आला.
या ट्रकमध्ये गोवा बनावटीच्या दारुच्या सुमारे ५९ हजारांपेक्षा जास्त बाटल्या आढळल्या.