vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

जाहीर प्रगटन

जाहीर प्रगटन

जालना प्रतिनिधी-

जालना शहरातील सर्व नागरिकांना याद्वारे जाहीर आवाहन करण्यात येते की, सध्या राज्यात अल्प प्रमाणात पर्जन्यमान झाल्यामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करणे व पाण्याचा अपव्यय रोखणे अत्यंत आवश्यक आहे.

या अनुषंगाने मा. आयुक्त महोदया, जालना शहर महानगरपालिका या स्वतः दर सोमवारी जालना शहरातील विविध भागांची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. या पाहणीदरम्यान शहरातील पाणीपुरवठ्याच्या जलवाहिन्यांवरील पाण्याची गळती, अनधिकृत नळ जोडण्या, अवैधरीत्या पाण्याचा उपसा, विद्युत मोटारींचा अनधिकृत वापर, रस्त्यावर वाहने धुणे, घरासमोरील रस्ते धुणे तसेच अन्य कोणत्याही प्रकारे पाण्याचा अपव्यय होत असल्याच्या बाबींची तपासणी करण्यात येणार आहे.

तरी, शहरातील सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की, सध्याच्या परिस्थितीत उपलब्ध पाण्याचा काटकसरीने व योग्य पद्धतीने वापर करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. नागरिकांनी पाणी भरल्यानंतर नळ तात्काळ बंद करावेत. पाणी रस्त्यावर, नाल्यांमध्ये किंवा इतर ठिकाणी विनाकारण वाहून जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच प्रत्येक नागरिकाने घरगुती नळांना योग्य प्रकारच्या तोट्या बसवून घ्याव्यात. घरगुती नळ जोडणी, नळ, तोट्या व अंतर्गत जलवाहिन्यांमधील गळती अथवा आवश्यक दुरुस्तीची कामे तात्काळ पूर्ण करून घ्यावीत.

खालील बाबींचे काटेकोरपणे पालन करावे :ज्या ठिकाणी पुरेसा पाणीपुरवठा होत आहे, अशा ठिकाणी महानगरपालिकेच्या मुख्य जलवाहिनीवरून थेट पाणी खेचण्यासाठी विद्युत मोटार किंवा पंपाचा वापर करू नये. अनधिकृत नळ जोडण्या तात्काळ अधिकृत करून घ्याव्यात. महानगरपालिकेच्या जलवाहिनीमध्ये पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही प्रकारची छेडछाड करू नये. रस्त्यावर वाहने धुणे, घरासमोरील रस्ते धुणे अथवा अन्य कोणत्याही कारणासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करून पाण्याचा अपव्यय करू नये. घरगुती नळ जोडणी, नळ, तोट्या व अंतर्गत जलवाहिन्यांमधील पाण्याची गळती तात्काळ दुरुस्त करून घ्यावी

वरील सूचनांचे उल्लंघन करून पाण्याचा अपव्यय अथवा अनधिकृत पाणी उपसा करताना आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध खालीलप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल :प्रथम उल्लंघन केल्यास – रु. 5,000/- दंड. द्वितीय उल्लंघन केल्यास – रु.10,000/- दंड. तृतीय उल्लंघन केल्यास – रु. 25,000/- दंड. तसेच, आवश्यकतेनुसार संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करण्यात येईलसध्याची पाणीटंचाईसदृश परिस्थिती लक्षात घेता, प्रत्येक नागरिकाने पाण्याचा काटकसरीने, जबाबदारीने व योग्य पद्धतीने वापर करावा. पाण्याचा प्रत्येक थेंब अनमोल असून, पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी सर्व नागरिकांनी महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

00000

संबंधित पोस्ट

दुष्काळात शेतकऱ्यांची सक्तीने कर्जवसुली नको; खासगी सावकारांच्या छळाविरुद्ध कठोर कारवाई करा!-पालकमंत्री जयकुमार रावल पाणी, चारा, रोजगार आणि अन्नधान्यासाठी गावनिहाय नियोजन करा; दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्यास सर्वोच्च प्राधान्य

vishwatmaklokswamivarta

सोलापूर येथे महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या मुख्य अभियंता कार्यालयाचे उद्घाटन सिंचन योजनांना गती देण्यासाठी सोलापूर कार्यालय ऐतिहासिक पाऊल -जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात बोट उलटून झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त पंतप्रधानांनी केली मदतीची घोषणा

vishwatmaklokswamivarta

प्रत्येक मत महत्त्वाचे; सर्व पदवीधर व शिक्षक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा- जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- मतपत्रिका अवैध ठरणार नाही, यासाठी मतदानाच्या नियमांचे पालन करा

vishwatmaklokswamivarta

कोणत्याही खाजगी अथवा अनधिकृत / शालेय परवाना नसलेल्या वाहनातूनशालेय विद्यार्थ्यांच्या पालकांना आपल्या पाल्यास शाळेत पाठवू नये

29 सप्टेंबरला नवी मुंबईत रबाळे येथे राज्यव्यापी भव्य रोजगार मेळावा

vishwatmaklokswamivarta