vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मतमोजणीचे कार्य जबाबदारीने पार पाडावे-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

मतमोजणीचे कार्य जबाबदारीने पार पाडावे-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

 

बुलडाणा, प्रतिनिधी : लोकसभा निवडणूकीचा अंतिम टप्पा हा मतमोजणी हा आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये मतमोजणी ही संवेदनशील बाब आहे. त्यामुळे मतमोजणीमध्ये प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी यांना नेमून दिलेली कामे जबाबदारीने पार पाडाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले.

 

जिल्हाधिकारी कार्यालयात आज अधिकारी आणि कर्मचारी यांचे निवडणुकीच्या मतमोजणीबाबत प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी निर्भय जैन, उपजिल्हाधिकारी सुरेश थोरात, राजेंद्र पोळ, समाधान गायकवाड, जयश्री ठाकरे, अजिंक्य गोडगे, उपविभागीय अधिकारी शरद पाटील, डॉ. रामेश्वर पुरी, शैलेश काळे, संजय खडसे आदी उपस्थित होते.

 

जिल्हाधिकारी डॉ. पाटील म्हणाले, मतदार नोंदणी, त्याची पडताळणी, मतदान आणि मतमोजणी हे चार टप्पे निवडणुकीच्या अनुषंगाने महत्वाचे आहे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी मतदानापर्यंतची प्रक्रिया पार पडली आहे. आता मतमोजणी हा अतिशय संवेदनशील टप्पा पार पाडावयाचा आहे. मतमोजणीसाठी नियुक्त कर्मचारी आणि अधिकारी यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात येत आहे. सर्व्हीस वोटर, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींचे पोस्टल मतदान आणि इव्हीएमवरील मतदान मोजण्यासाठी स्वतंत्र मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले आहे. मतमोजणीची प्रक्रिया सुरळीत व्हावी, यासाठी सर्वांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.

 

नियुक्त अधिकारी आणि कर्मचारी यांनी नेमून दिलेली कामे जबाबदारीने वेळेत पार पाडावी. मतमोजणीच्या दिवशी वेळेत उपस्थित राहणे गरजेचे आहे. ओळखपत्राशिवाय कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही, तसेच मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईल नेता येणार नसल्याने कर्मचाऱ्यांनी याबाबतच्या निर्देशाचे पालन करावे. मतमोजणीचे कार्य अत्यंत संवेदनशील असल्याने कर्मचाऱ्यांनी पूर्ण वेळ सजगतेने कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी केले.

संबंधित पोस्ट

नागालॅन्डच्या विकासासाठी नागामंडईचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते भूमीपूजन

vishwatmaklokswamivarta

केरळमध्ये तिघांचा मृत्यू,देशभरात कोरोनाचे 2,669 रुग्ण, जेएन-वन विषाणूचाही वाढता धोका….

vishwatmaklokswamivarta

मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनमुळे गुन्हेगारी तपास,वैज्ञानिक पध्दतीने, सक्षमतेने होण्यासाठी मदत- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन व दोन आयसर बसचे लोकार्पण

देशाचा अर्थव्यवस्थेचा थोर सरदार हरपला-काँग्रेस पक्षाचे वतीने स्व. मनमोहन सिंह यांना भावपूर्ण श्रद्धांजली..

vishwatmaklokswamivarta

डॉ मनसुख मांडविया यांनी ‘फिट इंडिया संडेज ऑन सायकल’ या उपक्रमांतर्गत नवी दिल्ली येथे खासदारांसोबत सायकल चालवली, नागरिकांना भारतात उत्पादित वस्तू विकत घेण्यासाठी केले प्रेरित आत्मनिर्भर व निरोगी भारताप्रति सरकारच्या वचनबद्धतेला दुजोरा देत राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी ‘गर्व से स्वदेशी’ या उपक्रमाला पाठिंबा दर्शवला

vishwatmaklokswamivarta

शिर्डीचे साईबाबा भाविकांच्या सुरक्षिततेसाठी ‘शिर्डी कृती आराखड्या’ची प्रभावी अंमलबजावणी करा – मुख्य सचिव राजेश अग्रवालसिंहस्थ कुंभमेळा नियोजन आढावा बैठक..

vishwatmaklokswamivarta