vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे प्रवेश सत्र सुरु;केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने राबविणार प्रवेश प्रक्रिया..

शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे प्रवेश सत्र सुरु;केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने राबविणार प्रवेश प्रक्रिया..

 

 राज्य प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर- राज्यातील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण योजनेतंर्गत ऑगस्ट 2024 या सत्रातील प्रवेश हे केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पद्धतीने (Centralized Online Admission Process) करण्यात येत आहे.प्रवेशाची सविस्तर माहितीपुस्तिका- प्रवेश पद्धती, नियमावली व प्रमाणित कार्यपद्धती दि.03 जून पासून प्रवेश संकेत स्थळ https://admission.dvet.gov.in वर उपलब्ध असून Download Section मध्ये Pdf स्वरुपात उपलब्ध करुन देण्यात आली आहे असे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाचे सह संचालक पी.टी.देवतळे यांनी कळविले आहे.

 

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांना प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये सोमवार दि.03 जून 2024 पासून रोज सकाळी 10 ते 11 या वेळेत नि:शुल्क मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात येत आहे. या सुविधेचाही सर्व उमेदवारांनी लाभ घ्यावा.माहिती व शंकानिरसनासाठी नजिकच्या शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडे संपर्क साधावा अथवा प्रादेशिक कार्यालयाच्या मदत कक्षास प्रवेश संकेतस्थळावर देण्यात आलेल्या दुरध्वनी क्रमांकावर सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

अर्ज करण्याची पद्धत :-

 

1. शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था या प्रवेश अर्ज स्विकृती केंद्र असतील. अर्ज स्विकृती केंद्रात उमेदवार ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे, पडताळणी, स्विकृती आणि निश्चिती करु शकतील.

 

2. उमेदवारांनी व पालकांनी माहिती पुस्तिकेत देण्यात आलेली माहिती, प्रवेश पद्धती व नियमांचा अभ्यास करुनच ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करावा.

 

3. अर्ज कोणत्याही ऑनलाईन माध्यमातून भरता येईल सर्व औड्योगिक प्रशिक्षण संस्था।मध्ये प्रवेश अर्ज व विकल्प भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.

 

4. प्रवेश अर्जात “Primary Mobile Number (प्राथमिक मोबाईल नंबर)” नोंदविणे अनिवार्य आहे. एका मोबाईल क्रमांकावर केवळ एकच प्रवेश अर्ज नोंदविता येईल. संपूर्ण प्रवेश प्रक्रियेबाबत उमेदवारांना वेळोवेळी SMS द्वारे माहिती व OTP (One Time Password) कळविण्यात येईल. त्यामुळे उमेदवारांनी आपला अद्ययावत मोबाईल क्रमांक नोंदवावा व हा मोबाईल क्रमांक प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बदलता येणार नाही.

 

5. ऑनलाईन अर्जात प्राथमिक माहिती भरल्यांनतर उमेदवारांचे प्रवेश खाते (Admission Account) त्यांचा नोंदणी क्रमांक (Registration Number) हाच User ID म्हणून तयार होईल.

 

6. उमेदवाराने त्यांच्या प्रवेश खात्यात प्रवेश (Login) करुन “Admission Activities” या मथळ्याखाली “Application Form” वर क्लिक करुन संपूर्ण प्रवेश अर्ज भरावा. प्रवेश अर्जात सादर केलेली सर्व माहिती योग्य असल्याचे पुन:श्च तपासून घ्यावे व प्रवेश अर्ज शुल्क ऑनलाईन पेमेंट गेटवेच्या माध्यमातून जमा करावे.

 

7. प्रवेश अर्ज शुल्क भरल्यावर व प्रवेश अर्ज निश्चित करण्यापूर्वी उमेदवारास प्रवेश अर्जातील माहितीत बदल करता येईल.

 

8. प्रवेश अर्ज शुल्कः    राखीव प्रवर्ग (Reserved Category): रु.100/-,: अराखीव प्रवर्ग (Unreserved Category): रु.150/-,

महाराष्ट्र राज्याबाहेरील उमेदवार (Outside Maharashtra State): रु.300/-,      अनिवासी भारतीय उमेदवार (Non Residental Indian): रु.500/-

9. उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज व शुल्क भरल्यानंतर तात्पुरत्या प्रवेश अर्जाची (Provisional Application Form) छापील प्रत (Print Out) घ्यावी.

10. प्रवेश अर्ज निश्चित करणे (Confirmation):

प्रवेश अर्ज निश्चित करण्यासाठी उमेदवारांनी प्रवेश अर्जातील माहिती, दाव्यांच्या पृष्ठ्यर्थ आवश्यक मूळ दस्तऐवज, कागदपत्रे, कागदपत्रांच्या छायांकीत प्रतीचा (Photocopy) एक संच व तात्पुरता प्रवेश अर्जाची छापील प्रत (Print Out) नजिकच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पडताळणीसाठी सादर करावेत. प्रवेशासाठी आवश्यक दस्तऐवज, कागदपत्रांची यादी प्रवेश संकेतस्थळावर Download या मथळ्याखाली तसेच माहिती पुस्तिकेत (प्रपत्र-3) उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

 

अर्ज स्विकृती केंद्रामधील अधिकारी हे उमेदवाराने अर्जात नमुद केलेल्या माहितीची उमेदवाराने सादर केलेल्या मूळ दस्ताऐवजावरुन काळजीपूर्वक तपासणी करतील. आवश्यक असल्यास उमेदवारास त्यांनी भरलेली माहिती सादर केलेल्या दस्तऐवज, कागदपत्राप्रमाणे दुरुस्त करण्याचे निर्देश देतील. तपासणीनंतर अर्जाचे निश्चितीकरण करुन उमेदवारास “अर्ज निश्चतीकरण पावती” (Application Contirmation Slip) व निश्चित केलेल्या प्रवेश अर्जाची (Confirmed Application Form) प्रत देतील.

 

अर्ज स्विकृती केद्रामधील अधिकारी अर्ज पडताळणी व प्रवेश अर्ज पडताळणी व प्रवेश अर्ज निश्चित केल्यावर उमेदवारास सर्व मूळ दस्तऐवज, कागदपत्रे परत करतील.

 

उमेदवारास प्रवेश अर्ज निश्चित करण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस कोणतेही शुल्क देय नाही.

 

प्रवेश अर्ज निश्चित केल्यानंतर औद्योगिक प्रशिक्षण.संस्था मूळ दस्तऐवज, कागदपत्रे परत करीत नसल्यास अथवा प्रवेश निश्चित करण्यासाठी शुल्क आकारत असल्यास उमेदवाराने त्वरीत मदत कक्षास संपर्क साधावा.

 

11. निश्चित केलेल्या प्रवेश अर्जाचाच सर्व प्रवेश फेऱ्यांकरिता विचार करण्यात येईल. निश्चित न केलेले अर्ज प्राप्तच झाले नाहीत असे समजण्यात येईल.

 

12. प्रवेश अर्ज निश्चित केल्यावर उमेदवारास प्रवेश अर्जातील माहितीत बदत करता येणार नाही. तथापि, उमेदवारास प्रवेश अर्जात सादर केलेल्या काही निवडक माहितीत बदल करावयाचा असल्यास त्यासाठी प्राथमिक गुणवत्ता फेरी नंतर “हरकती नोंदविणे” या फेरीत आपल्या प्रवेश खात्यात प्रवेश (Login) करुन तसा बदल करता येईल. तद्नंतर प्रवेश अर्जात कोणत्याही प्रकारे बदल करता येणार नाही.

 

13. प्रवेश अर्ज निश्चित केल्यावर पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करण्यासाठी प्रवेश संकेतस्थळावर नोंदणी क्रमांक (Registration Number) व पासवर्ड (Password) द्वारे प्रवेश (Login) करुन “Su

Submit/Change Oprions/Preferences” द्वारे सादर करावेत.

14. पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य पूर्ण भरल्यानंतर Option Form ची छापील प्रत Print Out घ्यावी.

 

15. उमेदवाराने एकच अर्ज भरावा. एकापेक्षा जास्त अर्ज भरल्यास त्या उमेदवाराचे सर्व अर्ज रद्द होतील. अशा उमेदवाराची निवड झाल्यास वा चूकीने प्रवेश देण्यात आला असल्यास त्याचा प्रवेश रद्द करण्यात येईल व उमेदवार संपूर्ण प्रवेश प्रक्रियेतून बाद होईल.

 

16. अनिवासी भारतीय व इतर राज्यातील रहिवासी असलेल्या उमेदवारांनी देखील दि.03 जून पासूनच ऑनलाईन प्रवेश अर्ज व चौथ्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करणे आवश्यक आहे.

 

17. प्रत्येक प्रवेश फेरीत निवड झालेल्या उमेदवारांना निवडपत्र (Allotment Letter) Online उपलब्ध करुन देण्यात येईल. यासाठी उमेदवारांनी आपल्या Account ला Login करुन निवडपत्राची प्रिंट घेऊन निवड झालेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेशासाठी दिलेल्या वेळापत्रकानूसार उपस्थित रहावे. उमेदवारांना निवडपत्राची (Allotment letter) छापील प्रत (Print Out) ज्या संस्थेत त्याची निवड झाली त्या संस्थेत घेता येईल.

 

18. उमेदवाराने त्यास बहाल करण्यात आलेल्या जागेवर प्रवेश निश्चित करतांना प्रवेश अर्जातील दाव्यांच्या पृष्ठ्यर्थ आवश्यक दस्तऐवज, कागदपत्रे संबंधित संस्थेत तपासणीसाठी सादर करावेत. प्रवेश निश्चितीच्या वेळी आवश्यक दस्तऐवज, कागदपत्रे सादर करुन न शकल्यास वा माहितीत तफावत आढळल्यास उमेदवारांना बहाल करण्यात आलेली जागा रद्द करण्यात येईल व उमेदवाराला पुढील प्रवेश फेऱ्यांतून बाद करण्यात येईल.

 

प्रवेशाचे वेळापत्रक :-

 

प्रवेश प्रक्रियेचा तपशिल

 

1.ऑन लाईन प्रवेश अर्ज करणे-ऑनलाईन व पद्धतीने प्रवेश अर्ज भरणे, अर्जात दुरुस्ती (Edit) करणे व प्रवेश अर्ज शुल्क जमा करणे प्रारंभ दिनांक 3 जून स.11 वाजेपासून, अंतिम दिनांक 30 जून 2024 सायं 5 वाजेपर्यंत.

 

2.प्रवेश अर्ज निश्चित करणे-अर्ज स्विकृती केंद्रात (राज्यातील शासकीय वा खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत) मूळ कागदपत्रांच्या तपासणीनंतर प्रवेश अर्ज निश्चित (Confirmation) करणे. प्रारंभ दिनांक 3 जून 2024 स.11 वाजेपासून, अंतिम दिनांक 01 जुलै 2024 सायं 5 वाजेपर्यंत.

 

3.पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करणे

 

प्रवेश अर्ज शुल्क भरल्यावर पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करण्यासाठी प्रवेश संकेतस्थळावर नोंदणी क्रमांक (Registration No.) व पासवर्ड (Password) द्वारे प्रवेश (Login) करुन सादर करणे. प्रांरभ दिनांक 3 जून 2024 स.11 वाजेपासून, अंतिम दिनांक 02 जुलै 2024 सायं 5 वाजेपर्यंत

 

4. प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे-प्राथमिक गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे व उमेदवारांना SMS द्वारे कळविणे.04 जुलै,2024 स.11 वाजता.

 

5. गुणवत्ता यादी बाबत हरकती नोंदविणे व प्रवेश अर्जातील माहितीत बदल करणे-गुणवत्ता यादीबाबत हरकती असल्यास प्रवेश संकेतस्थळावर दिलेल्या Helpl

Helpline क्रमांक, नजिकच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वा ई.मेल व द्वारे उमेदवार हरकती नोंदविणे. प्रवेश अर्जात सादर केलेल्या काही निवडक माहितीत बदल करावयाचा असल्यास प्रवेश खात्यात प्रवेश (Login) करुन तसा बदल करणे. तद्नंतर प्रवेश अर्जात कोणत्याही प्रकारे बदल करता येणार नाही. प्रांरभ दिनांक 4 जुलै 2024 स.11 वाजेपासून, अंतिम दिनांक 05 जुलै 2024 सायं 5 वाजेपर्यंत

 

6.अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे-अंतिम गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे व उमेदवारांना SMS द्वारे कळविणे. 7 जुलै 2024 सायं.5 वाजेपर्यंत

 

7.पहिली प्रवेश फेरी-पहिल्या प्रवेश फेरीसाठी संस्था व व्यवस्थापकीय निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे व उमेदवारांना SMS द्वारे कळविणे. 14 जुलै, 2024 सायं 5 वाजेपर्यंत, पहिल्या प्रवेशफेरीसाठी निवड झालेल्या संस्थेत उमेदवारांनी सर्व मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी उपस्थित राहून प्रवेशाची प्रत्यक्ष कार्यवाही करणे.

 

पहिली प्रवेश फेरी प्रारंभ दि.15 जुलै 2024 स.9 वाजेपासून ते 19 जुलै 2024 सायं 5 वाजेपर्यंत.

 

तिसरी प्रवेश फेरी प्रांरभ दि.28 जुलै 2024 स.9 वाजेपासून ते 2 ऑगस्ट 2024 सायं.5 वाजेपर्यंत.

 

चौथी प्रवेश फेरी प्रांरभ 10ऑगस्ट 2024 स.9 वाजेपासून ते 14ऑगस्ट 2024 सायं 5 वाजेपर्यंत

 

नव्याने ऑन लाईन प्रवेश अर्ज करणे अर्ज निश्चित करणे विहीत मुदतीत प्रवेश अर्ज सादर करु न शकलेल्या उमेदवारांना समुपदेशन फेरीत संधी उपलब्ध करुन देण्यासाठी ऑन लाईन पद्धतीने प्रवेश अर्ज भरणे, अर्जात दुरुस्ती (Edit) करणे व प्रवेश अर्ज शुल्क भरणे. प्रांरभ 17 जुलै 2024 स.9 वाजेपासून ते 24 ऑगस्ट 2024 सायं 5 वाजेपर्यंत

 

खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील संस्था स्तरावरील प्रवेश प्रांरभ दिनांक 21 जुलै 2024 स.9 वाजेपासून ते अंतिम दिनांक प्रवेश प्रक्रियेच्या अंतिम दिनांकापर्यंत.

 

महत्त्वाची सूचना :-

 

1. उमेदवाराने त्याच्या प्रवेश खात्याचा (Admission Account) पासवर्ड (Password) कोणासही देऊ नये व त्यासंबंधी संपूर्ण गोपनियता पाळावी. Password विसरल्यास तो Reset करण्याची सुविधा संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

 

2. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (PPP) अंतर्गत राज्यात असलेल्या 250 औ.प्र. संस्थांमधील सर्व अभ्यासक्रमातील 20% जागा माहिती पुस्तिकेत दिलेले विशेष प्रशिक्षण शुल्क आकारुन गुणवत्तेनुसार भरण्यात येतील. त्या जागांसाठी इच्छुकांना Online प्रवेश प्रक्रीयेत स्वतंत्र विकल्प (Option) देण्याची मुभा राहणार आहे.

 

3. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) योजनेंतर्गत प्रवेशासाठी उपलब्ध जागा (IMC Seats) व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने प्रवेश देण्यात येणाऱ्या जागांवर प्रवेशित प्रशिक्षणार्थ्यांना त्यांच्या प्रवर्गानुसार 80 ते 100% व्यवसाय प्रशिक्षण प्रतिपूर्ती योजना लागू करण्यात आली आहे.

 

4. प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ज्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील व्यवसायांत एकूण प्रवेश क्षमतेच्या 50% पेक्षा कमी प्रवेश झाले असतील अशा व्यवसायातील प्रवेशित उमेदवारांना त्याच संस्थेत इतर व्यवसायात किंवा जवळच्या दुसऱ्या शासकीय औ.प्र. संस्थेतील संबंधित व्यवसायात समावून घेण्यात येईल.

 

5.राज्यातील सर्व शासकीय व मान्यता प्राप्त खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था

[i: प्रशिक्षण संस्था व या संस्थेतील संलग्न व्यवसाय अभ्यासक्रमांच्या तुकड्याची यादी https://admission.dvdt.gov.in, www.dvet.gov.in तसेच www.ncvtmis.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे. तरी प्रवेशोच्छुक सर्व उमेदवारांनी सदर संकेतस्थळांना एकवेळ अवश्य भेट द्यावी.

 

00000

संबंधित पोस्ट

आज देशभरात मोठ्या थाटामाटात साजरी होणार ‘श्रीकृष्णजन्माष्टमी….

vishwatmaklokswamivarta

मातीचा गंध आपल्याला शेतीकडे, आपल्या जन्मभूमीकडे खेचून आणतो. जेंव्हा मी माझ्या जन्मभूमीत येतो, तेव्हा माझे पाय आपोआप शेतीकडे वळतात, अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

नागपूर मध्ये भाजप आमदार बंटी भांगडीयांच्या नातेवाईकाच्या गाडीवर हल्ला

पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावाआपत्ती काळात नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य -पालकमंत्री शंभूराज देसाई

निवडणूक कालावधीत राज्य उत्पादन शुल्काची कारवाई*आतापर्यंत 70 गुन्हे नोंद*उत्पादन शुल्कचे चेकपोस्ट

राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी कल्याणकारी योजना- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta