vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

देशी गोवंश संवर्धनासाठी अनुदान; गोशाळांकडून अर्ज मागविले..

देशी गोवंश संवर्धनासाठी अनुदान; गोशाळांकडून अर्ज मागविले..

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी:- देशी गोवंशाचे संवर्धन, संरक्षण व कल्याणासाठी महाराष्ट्र गोसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली असून गोशाळांना देशी गोवंशासाठी प्रति दिन प्रति गोवंश ५० रुपये अनुदान देण्याची योजना राबविण्यात येत आहे. त्यासाठी गोसेवा आयोगाकडे नोंदणी झालेल्या गोशाळांकडून ३१ डिसेंबर पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत,असे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. एन.एस. कदम यांनी कळविले आहे.

गोसेवा आयोगाकडे नोंदणी झालेल्या व ५० पेक्षा जास्त गोवंश संख्या असलेल्या गोशाळांनी या योजनेसाठी दि.३१ डिसेंबर पर्यंत http://mhgosevaayog/form_goshala3/ या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे. सादर केलेल्या अर्जांची आयोगामार्फत दि.१ ते १० जानेवारी २०२५ या कालावधीत तपासणी करण्यात येणार आहे. प्राथमिक तपासणीनंतर ११ ते २० जानेवारी २०२५ दरम्यान प्रत्यक्ष गोशाळांची भेट देऊन पडताळणी करण्यात येईल. त्यानंतर पात्र ठरणाऱ्या गोशाळांचे प्रस्ताव आयोगाकडे पाठविण्यात येतील. तरी जिल्ह्यातील गोशाळांनी आपले प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने अर्ज करुन पाठवावे. अधिक माहितीसाठी तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी, पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अथवा उपायुक्त कार्यालय, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय अथवा नजिकच्या पशुवैद्यकीय केंद्रावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. एन.एस. कदम यांनी केले आहे.०००००

संबंधित पोस्ट

मराठवाडा मुक्तीसंग्राम दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शन दि.१५ सप्टेंबर पासून…

vishwatmaklokswamivarta

मिरवणुकांमध्ये प्लाझमा, बीम लाईट, लेझर बीम लाईटच्या वापरास प्रतिबंध

vishwatmaklokswamivarta

सायबर गुन्ह्यात ‘फ्रीज’ केलेल्या बँका खात्यांना पोलिस प्रमाणपत्रावर बँकांनी खुले करावे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सातारा येथील बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील वाहतुकीत बदल

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनालाभार्थींना कर्जाचे धनादेश वाटप व प्रशिक्षण प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम संपन्न

vishwatmaklokswamivarta

जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत परीक्षा मार्गदर्शन शिबिर व सत्कार सोहळा संपन्न,स्पर्धा परीक्षेची तयारी करताना स्वयंप्रेरणा महत्त्वपूर्ण  -जिल्हाधिकारी आशिष येरेकर