vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मारवाडी समाजाचे आराध्य दैवत असलेल्या शितला माता मंदिर परिसर स्वच्छता करा-विकासकुमार बागडी..

मारवाडी समाजाचे आराध्य दैवत असलेल्या शितला माता मंदिर परिसर स्वच्छता करा-विकासकुमार बागडी..

जालना : प्रतिनिधी काद्राबाद येथील दर्गा बेस समोर निजाम कालीन पुर्वीचा शितलामाता मंदिर असून दर वर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा दि. 15 मार्च ते 28 मार्चपर्यंत पुजा महोत्सव करण्यात येणार आहे. सदर मंदिरामध्ये दर्शनासाठी आणि पुजासाठी अग्रवाल, माहेश्वरी, ब्राम्हण, जैन, जाट, गुजर, नाभिक असे पंचवीस ते तीस हजार मारवाडी राजस्थानी समाजातील लोकं सहकुटूंब येणार आहेत. सदर मारवाडी समाजाचे लोकं हमखास रात्री 12 ते सकाळी 8 या वेळेत जास्त संख्येने पुजाला येत असल्याचे व्हाईस ऑफ मिडीयाचे प्रदेश उपाध्यक्ष विकासकुमार बागडी यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात श्री. बागडी यांनी जालना महानगर पालिकेचे स्वच्छता विभाग प्रमुख पंडीत पवार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या पाणी वेस ते राजमहेल टॉकीज, मुर्तीवेस पर्यंत महानगर पालिकेने अतिक्रमण काढलेले आहे. त्यामुळे रस्त्यावर मातीचे ढिग असून रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. तसेच शितलामाता मंदिर परिसरात कचरा आणि घाण पसरलेली आहेे. तात्काळ स्वच्छता विभागामार्फत ट्रॅक्टर लावून हा परिसर स्वच्छ करुन देण्यात यावा, मंदिर परिसरातील अनेक पथदिवे बंद असून ते तात्काळ चालू करण्यात यावे व मंदिरासमोर एका अज्ञान व्यक्तीने बेकायेदेशिरपणे मटन दुकान चालू केलेली आहे. ती त्वरीत बंद करण्यात यावी. येणार्‍या भाविकांना कोणताही त्रास होणार नाही, भाविकांना विनंती करण्यात येते की, सध्या शहरामध्ये गुन्हेगारी वाढली असून दर्शनासाठी येत असतांना दागिने किंवा महाग वस्तू घेऊ नये, तसेच 12 नंतरचे दर्शन टाळून सकाळी 5 ते रात्री 10 असे दिवसभर दर्शन, पुजा करता येईल, अशी विनंतीही श्री. विकासकुमार बागडी, नगरसेवक विष्णू पाचफुले, सामाजिक कार्यकर्ते मेघराज चौधरी यांनी केली आहे.

—फोटो कॅप्शन : छायाचित्रात निवेदन देतांना विकासकुमार बागडी यांच्यासह नगरसेवक विष्णू पाचफुले, सामाजिक कार्यकर्ते मेघराज चौधरी, स्वच्छता विभाग पअमुख पंडीत पवार, लिपीक ऋषी शिडुते आदी दिसत आहेत.

संबंधित पोस्ट

महाराष्ट्रात कोरोना वाढता प्रभाव, एका दिवसात 65 नवे रुग्ण, मुंबईत 22 संक्रमित, पुन्हा लॉकडाऊन ?आरोग्य विभाग नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे, मास्क घालण्याचे आणि गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळण्याचे आवाहन

बुलढाण्यात जिल्हास्तर युवा महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

vishwatmaklokswamivarta

ओबीसी महामंडळाची थकीत व्याज दरात सवलत योजना…

vishwatmaklokswamivarta

अक्कलकोट बसस्थानकाच्या पुनर्बांधणीचे ५५ टक्के काम पूर्ण- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून प्रस्ताव तातडीने शासनास सादर करा – मंत्री छगन भुजबळ बियाणे, खते शेतकऱ्यांना मुबलक उपलब्ध होण्यासाठी सुयोग्य नियोजन करा

vishwatmaklokswamivarta

सुजलाम सुफलाम सावनेरच्या विकासाच्या दिशेने दमदार सुरुवात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ३१ कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन; विश्व शांतीसाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विश्व महाआरतीचा गिनिज बुक रेकॉर्ड