vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

आरटीई प्रवेशासाठी प्रतीक्षा यादी टप्पा ३ प्रवेश फेरी सुरू शिक्षणाधिकाऱ्यांचे पालकांना महत्त्वाचे आवाहन

आरटीई प्रवेशासाठी प्रतीक्षा यादी टप्पा ३ प्रवेश फेरी सुरू शिक्षणाधिकाऱ्यांचे पालकांना महत्त्वाचे आवाहन

 

ठाणे प्रतिनिधी (जिल्हा परिषद, ठाणे) – जिल्ह्यातील बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार (आरटीई) अधिनियम, २००९ नुसार, यंदाही २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवली जात आहे. आज, दि. २८ एप्रिल, २०२५ रोजी प्रतीक्षा यादी टप्पा क्रमांक ३ मधून निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही प्रक्रिया दि. २८ एप्रिल २०२५ ते दि. ७ मे २०२५ या कालावधीत पूर्ण करायची आहे.

    निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रवेशासाठी आवश्यक असलेली माहिती SMS द्वारे पाठवली जात आहे. मात्र पालकांनी केवळ SMS वर अवलंबून न राहता, आरटीई पोर्टलवरील ‘अर्जाची स्थिती’ या टॅबवर आपल्या बालकांचा अर्ज क्रमांक टाकून अर्जाची स्थिती नियमितरित्या तपासावी, असे आवाहन शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी केले आहे     प्रतीक्षा यादीतील निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी अलोटमेंट लेटर व आवश्यक कागदपत्रे घेऊन विहित मुदतीत नजीकच्या पडताळणी केंद्रावर जाऊन दस्तऐवजांची तपासणी करून प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. सर्व कागदपत्रांची पडताळणी दि. ७ मे २०२५ पर्यंत पूर्ण करावी लागेल.   ठाणे जिल्ह्यातील पंचायत समिती आणि महानगरपालिका क्षेत्रातील एकूण ६२७ पात्र शाळांमध्ये ११,३२० रिक्त जागा उपलब्ध होत्या. आतापर्यंत ८,३५८ प्रवेश पूर्ण झाले आहेत. प्रतीक्षा यादी टप्पा ३ अंतर्गत उर्वरित रिक्त जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

00000

संबंधित पोस्ट

नववर्ष प्रण-सुरक्षित अन्न’ मोहिमेचा समारोप;दर्जेदार रेस्टॉरंट्सचा जिल्हाधिकारी  आशिमा मित्तल यांच्या हस्ते गौरव

शहरात राहणाऱ्या अनुसूचित जाती, नवबौद्धांना  घरकुलासाठी मिळणार ₹२.५० लाख- जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटीलØ सर्व नगरपरिषद क्षेत्रात रमाई आवास योजना सूरुØ गरजुंनी लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आव्हान

विकासकामांना पूर्ण वेगाने पूढे न्या – मुख्य सचिव सुजाता सौनिक-दोन आठवड्याच्यावर विकासकामे प्रलंबित ठेवू नये शासकीय कामात तंत्रज्ञानाचा वापर वाढवा…

vishwatmaklokswamivarta

नांदेड जिल्ह्यात बारावीची परीक्षा भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरणात – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले,कठोर नियंत्रण, झूम वेबकास्ट व ड्रोन चित्रीकरणामुळे प्रशासनाचे यश पुढील सर्व परीक्षांसाठी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय यंत्रणा सक्रिय..

रस्ता दुभाजक तोडणाऱ्यांवर पोलीस;परिवहन आणिसाबांविने संयुक्त कारवाई करावी- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

भेसळयुक्त अन्नपदार्थांची विक्री आढळल्यास ग्राहकांनी टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी- सहायक आयुक्त (अन्न) रा. अ. समुद्रे- अन्न पदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांची धडक तपासणी मोही- 9 अन्न व्यावसायिकांचे परवाने निलंबित, 51 जणांना सुधारणा नोटीस- आतापर्यंत पावणेचार लाखाहून अधिक किंमतीचा खाद्यतेलाचा साठा जप्त

vishwatmaklokswamivarta