vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

विधानसभा प्रश्नोत्तरे-परवानाधारक व्यापाऱ्यांनाच बांधावर जाऊन शेतमाल खरेदीची परवानगी- पणन मंत्री जयकुमार रावल

विधानसभा प्रश्नोत्तरे-परवानाधारक व्यापाऱ्यांनाच बांधावर जाऊन शेतमाल खरेदीची परवानगी- पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई, प्रतिनिधी : बांधावर जाऊन शेतमाल खरेदी करणे अडचणीचे होत आहे. यामधून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे प्रकार राज्यात निदर्शनास येत आहेत. त्यामुळे यापुढे बांधावर जाऊन शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीचा परवाना बंधनकारक करण्यात येणार आहे. परवाना असलेल्या व्यापाऱ्यांनाच संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीच्या क्षेत्रात बांधावर जाऊन शेतमाल खरेदीची परवानगी देण्यात येईल, असे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. याबाबत सदस्य दौलत दरोडा यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

या प्रश्नाच्या उत्तरात अधिक माहिती देताना मंत्री श्री. रावल म्हणाले, अकोला जिल्ह्यातील अंदुरा ॲग्रो प्रोडूसर कंपनीने (ता. बाळापूर) शेतकऱ्यांचा सोयाबीन शेतमाल खरेदी केला. खरेदी केलेला शेतमाल वखार महामंडळाच्या गोदामात ठेवण्यात आला. वखार महामंडळाच्या गोदामातील पावत्या आणि खरेदी केलेल्या शेतमालामध्ये १,२९७ क्विंटलची तफावत आढळून आली आहे. याबाबत कंपनीचे मालक व अन्य ११ लोकांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तफावतीचे पैसे शेतकऱ्यांना देण्यासाठी कंपनीचा बाजार समितीकडून देय असलेला ३६ लाख रुपयांचा निधी अडकविण्यात आला आहे. शेतकऱ्यांचे पैसे तातडीने देण्यासाठी वसुलीची कार्यवाही करण्यात येत आहे.

शेतीशी संबंधित शेतकऱ्यांचे फसवणुकीचे गुन्हे कमी करण्यासाठी ‘कृषी गुन्हे शाखा’ आणि कृषी न्यायालय स्थापन करण्याबाबत शासन सकारात्मक आहे. यावर्षीच्या हंगामासाठी सोयाबीन खरेदी केंद्र वाढविण्याबाबत शासन सकारात्मक आहे. मागील वर्षात राज्यामध्ये देशातील सर्वाधिक ११ लाख २१ हजार क्विंटल सोयाबीन खरेदीचा उच्चांक करण्यात आला. या वर्षी सुद्धा हाच प्रयत्न राहणार आहे असेही पणन मंत्री श्री. रावल यांनी सांगितले.

प्रश्नाच्या चर्चेमध्ये सदस्य भास्कर जाधव, नाना पटोले, कैलास पाटील, सुधीर मुनगंटीवार, रोहित पवार, रणधीर सावरकर, असलम शेख, श्रीमती सुलभा खोडके यांनीही सहभाग घेतला.

0000

संबंधित पोस्ट

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मनुष्यबळाचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे राज्य निवडणूक आयोगाने केले अभिनंदन

vishwatmaklokswamivarta

आरटीई” प्रवेशासाठी पालकांनीकोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नये कोणताही गैरप्रकार आढळून आल्यास संबंधितावर नियमानुसार फौजदार स्वरुपाची कारवाई-शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद गोसावी

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय महिला आयोगाचा उपक्रम; येत्या ८ मार्चपासून जिल्हा मुख्यालयात विवाहपूर्व समुपदेशन केंद्र कार्यान्वित होणार

vishwatmaklokswamivarta

गौण खनिजाच्या अवैध उत्खनन, वाहतुकीविरोधात जिल्हाधिकारी ‘ॲक्शन’ मोडवर,पोलीस, आरटीओ, महसूल प्रशासनाला संयुक्त कारवाईचे दिले निर्देश..

अमृत’तर्फे ‘मानसमित्र’चे मोफत प्रशिक्षण;समुपदेशन क्षेत्रात संधी

📮 **डाक अदालत ९ मार्चला – तक्रारींसाठी संधी!**