vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

मिरजच्या शासकीय प्रौढ अपंग प्रशिक्षण केंद्रात प्रवेश प्रक्रीया सुरु

मिरजच्या शासकीय प्रौढ अपंग प्रशिक्षण केंद्रात प्रवेश प्रक्रीया सुरु

  सातारा प्रतिनिधी शासकीय प्रौढ अपंग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह, मिरज या संस्थेत 2025-26 या चालू शैक्षणक वर्षासाठी सर्टिफिकेट इन कॉम्युटर ऑपरेशन वुईथ एम.एस. ऑफिस (संगणक कोर्स ), मोटार ॲन्ड आमेंचर वायडींग, सबमर्सिबल पंप सिंगल फेज, (इलेक्ट्रीक कोर्स ) अभ्यासक्रमासाठी मोफत प्रवेश देणे सुरु आहे. यासाठी वयोमर्यादा 16 ते 40 वर्ष असून प्रशिक्षण कालावधी 1 वर्ष आहे. या कोर्ससाठी फक्त दिव्यांग मुलांनाच प्रवेश दिला जाईल.

   प्रशिक्षण कालावधीत राहण्याची, जेवणाची व प्रशिक्षणाची मोफत सोय असून, अद्यावत व परीपूर्ण संगणक कार्यशाळा, भरपूर प्रॅक्टीकल्स व व्यवसायाभिमुख मोफत प्रशिक्षण, नेटवर्कीग व इंटरनेटची सुविधा, समाज कल्याण विभागाकडून स्वयंरोजगारासाठी, व्यवसायासाठी बीज भांडवल योजना सवलत उपलब्ध आहे

     प्रवशे अर्ज व माहतीपत्रक अधिक्षक, शासकीय प्रैाढ अपंग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह टाकळी रोड, म्हेत्रे मळा, गोदड मळ्याजवळ, मिरज ता. मिरज जि. सांगली पिनकोड -416410 दुरध्वनी नंबर – 0233 -2222908 मोबाईल 9922577561, 9595667936, 9325555981 अधिक माहितीसाठी या क्रमांकावर संपर्क साधावा. प्रवेशासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. प्रवेश अर्ज पूर्णपणे भरुन फोटोसह संस्थेकडे पाठवावेत किंवा समक्ष भरुन द्यावेत, असे आवाहन अधिक्षक शासकीय प्रौढ अपंग प्रशिक्षण केंद्र व शासकीय वसतिगृह मिरज जि. सांगली यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

तीर्थक्षेत्र विकासकामे दर्जेदार सुविधांसह कालमर्यादेत पूर्ण करावीत -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,महाराष्ट्रातील विविध तीर्थक्षेत्रे, गडकिल्ले आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी ९९३ कोटींच्या कामांना मान्यता…

राज्याच्या खेडोपाड्यातील ७ कोटी लाभार्थ्यांना धान्यवाटप करणाऱ्या शिधावाटप दुकानदारांच्या कमिशनमध्ये प्रतिक्विंटल २० रुपयांची वाढ करुन ते १५० रुपयांवरुन १७० रुपये करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री तथा अन्न व नागरीपुरवठा मंत्री अजित पवार

शाळेचा पहिला दिवस उत्साहात…! सिनगाव जहाँगीर येथे शाळा प्रवेशोत्सव जल्लोषात साजरा; शिक्षणमंत्री ना.दादाजी भुसे यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत

vishwatmaklokswamivarta

राज्यात राबविण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी नदीजोड प्रकल्पांतील कामांना गती देण्याच्या अनुषंगाने जलसंपदा मंत्री  राधाकृष्ण विखे- पाटील आढावा 

vishwatmaklokswamivarta

महाराणा प्रतापसिंह यांचा पुतळा प्रेरणास्थान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपती संभाजीनगर येथील महाराणा प्रतापसिंह यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण

ऑनर्स’ व ‘ऑनर्स विथ रिसर्च’ अभ्यासक्रमासाठी तीन दिवसीय ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन -उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य, संचालक आणि प्राध्यापकांसाठी प्रशिक्षण अनिवार्य