vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

नवी मुंबईतील ओल्या कच-यापासून निर्माण होणा-या खताला लाभला राज्य नोंदणीकृत “हरित महासिटी कंपोस्ट” ब्रँड नवी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाला नवी मानांकित ओळख

नवी मुंबईतील ओल्या कच-यापासून निर्माण होणा-या खताला लाभला राज्य नोंदणीकृत “हरित महासिटी कंपोस्ट” ब्रँड नवी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाला नवी मानांकित ओळख

 

       नवी मुंबई प्रतिनिधी-   शहरात निर्माण होणारा ओला कचरा व सुका पालापाचोळा या विघटनशील कच-यावर प्रक्रिया करुन तयार होणा-या सेंद्रिय खताची विपणन व विक्री (Marketing And Sales) करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा “हरित महासिटी कंपोस्ट”हा अधिकृत व राज्य-नोंदणीकृत ब्रँड आहे.

          नवी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी ओल्या कच-यापासून निर्माण होणा-या खताच्या विपणन व विक्रीकरीता महाराष्ट्र शासनाचा “हरित महासिटी कंपोस्ट”हा हरित ब्रॅंड वापरण्यास परवानगी प्राप्त झालेली आहे. यामुळे देशातील सर्वोत्तम स्वच्छ शहरांच्या ‘सुपर स्वच्छ लीग’ या विशेष कॅटेगरीत समाविष्ट असणा-या नवी मुंबई शहराला महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणखी एक विशेष मानांकन लाभले आहे.

          “हरित महासिटी कंपोस्ट”हा ब्रँड महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या पुढाकाराने शहरी ओल्या कचऱ्यापासून तयार होणाऱ्या सेंद्रिय खताचा प्रचार व विपणन करण्यासाठी विकसित करण्यात आला आहे. हा ब्रँड राज्य कचरा व्यवस्थापन नियम तसेच खत नियंत्रण आदेश (FCO) अंतर्गत निर्धारित केलेल्या गुणवत्ता मानकांचे काटेकोरपणे पालन करतो. नवी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी निर्माण होणारे सेंद्रिय खत त्या गुणवत्तेचे ठरले आहे. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेच्या कच-यापासून निर्माण होणारे खत हे आता “हरित महासिटी कंपोस्ट”या विशेष ब्रँडने ओळखले जाणार आहे.

          या ब्रँडव्दारे उच्च दर्जाचे सेंद्रिय खत विक्रीसाठी उपलब्ध करून देता येणार असून, क्षेपणभूमीमध्ये जाणारा कचरा लक्षणीयरीत्या कमी होण्यास मदत होत आहे. तसेच मातीची सुपिकता वाढवून, वनस्पतींचे आरोग्य सुधारण्यातून शाश्वत शेतीला चालना मिळत आहे.

          त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या तुर्भे क्षेपणभूमी येथील घनकचरा प्रक्रिया प्रकल्पामध्ये नागरी घनकचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करुन दैनंदिन सरासरी 30 ते 40 मेट्रिक टन सेंद्रिय खताची निर्मिती करण्यात येत आहे. या सेंद्रिय खताचा वापर नवी मुंबई महानगरपालिकेच्या उद्यानांमध्ये केला जात आहे. तसेच हे सेंद्रिय खत शेतकऱ्यांना विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येत असून, त्यातून शेतकऱ्यांना पर्यावरणपूरक व गुणवत्तापूर्ण खताचा लाभ होत आहे.

          नवी मुंबई महानगरपालिका पर्यावरण संवर्धन, कचरा व्यवस्थापन आणि शाश्वत विकासाच्या दिशेने आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने प्रयत्नशील असून, त्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी कच-यापासून निर्माण होणा-या खतास “हरित महासिटी कंपोस्ट” ही ब्रॅण्डेड ओळख प्राप्त झाल्याने ही नवी मुंबई महानगरपालिकेसाठी विशेष उल्लेखनीय अभिमानाची गोष्ट आहे.

 

संबंधित पोस्ट

दुर्घटनेला जबाबदार कोण? नागरिकांचा संताप — आंदोलन करणारे रेल्वे कर्मचारीच जबाबदार?मध्य रेल्वे मार्गावर सँन्डहर्स्ट रोड स्थानकाजवळ घडलेल्या दुर्दैवी रेल्वे अपघाताने सर्वत्र संतापाची लाट ..

vishwatmaklokswamivarta

विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच सकस आहार देण्यास कटिबद्ध – शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे

vishwatmaklokswamivarta

शालेय जीवनात उद्यमशीलतेला चालना देण्यासाठी‘सक्षम’ कार्यक्रम ठरला प्रभावी…

vishwatmaklokswamivarta

विकसित महाराष्ट्राच्या उद्दिष्टपूर्तीत महिलांचा सहभाग वाढविणे गरजेचे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस• महिलांच्या सहभागाने विकसित महाराष्ट्र २०४७ चे उद्दिष्ट गाठणे शक्य• राष्ट्रीय व राज्य महिला आयोगाच्यावतीने शक्ती संवादाचे आयोजन

जालन्यातील लक्कडकोट येथील जमीन वादाने पेटले रान; जयश्री कटके यांच्याकडून पोलीस व राजकारण्यांवर गंभीर आरोप

दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी प्रस्तावित योजनांची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध : जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील उल्हास वैतरणा कोकण-गोदावरी नदीजोड प्रकल्प कार्यालयाचे उद्घाटन