vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्ह्यातील ६९३ ग्रामपंचायतींमध्ये स्वयंचलित हवामान केंद्र उभारणीचा प्रस्ताव शासनाकडे सादर-– जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

जिल्ह्यातील ६९३ ग्रामपंचायतींमध्ये स्वयंचलित हवामान केंद्र उभारणीचा प्रस्ताव शासनाकडे सादर-– जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

जालना, प्रतिनिधी-केंद्र सरकारच्या WINDS (Weather Information Network Data System) प्रकल्पाअंतर्गत जालना जिल्ह्यातील ६९३ ग्रामपंचायतींमध्ये स्वयंचलित हवामान केंद्र (AWS – Automatic Weather Station) बसविण्याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांनी दिली.

  जिल्ह्यात दरवर्षी पावसाळ्यात प्रत्येक गावात झालेल्या पर्जन्यमानाची अचूक व विश्वासार्ह आकडेवारी उपलब्ध होत नसल्याने, ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्याचा निर्णय सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आला होता. त्यानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीकडून आवश्यक प्रस्ताव मागविण्यात आले होते.

 जालना जिल्ह्यात एकूण ७९१ ग्रामपंचायती असून, त्यापैकी ४९ ग्रामपंचायतींमध्ये यापूर्वीच स्वयंचलित हवामान केंद्र कार्यान्वित आहेत. उर्वरित ग्रामपंचायतींपैकी ६७१ ग्रामपंचायतींमध्ये शासकीय जागेत, तर २२ ग्रामपंचायतींमध्ये भाडेतत्त्वावर जागा घेऊन स्वयंचलित हवामान केंद्र कार्यान्वित करण्यात येणार आहेत.

    यासंदर्भातील सर्व प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाले असून, ते शासनाकडे मान्यतेसाठी सादर करण्यात येणार आहेत. या प्रकल्पामुळे पर्जन्यमान, तापमान, आर्द्रता यासह हवामानविषयक अचूक माहिती उपलब्ध होणार असून, शेती नियोजन, पीक विमा, आपत्ती व्यवस्थापन व शेतकऱ्यांच्या निर्णय प्रक्रियेस मोठा लाभ होणार असल्याचे जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांनी नमूद केले.

संबंधित पोस्ट

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आरोग्य विभागाचा आढावा;कार्यतत्पर राहून आरोग्य यंत्रणेने काम करावे – डॉ. किरण पाटील

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्रीराम अर्बन को-ऑप. बँक लिमिटेडच्या चिंचभवन शाखेचे उद्घाटन

१३ तासात ३०० किमी सायकलिंग पूर्ण :कैलास झोळगे ठरले पोडियम फिनिशर्स

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष यांनी घेतला आढावा-मराठा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहोचवा – नरेंद्र अण्णासाहेब पाटील

मिरज तालुक्यातील 8 पाणंद, शिवरस्ते झाले अतिक्रमणमुक्त- 7.5 कि.मी. लांबीचे एकूण 8 रस्ते अतिक्रमणमुक्त झाल्याने 750 शेतकऱ्यांना मिळणार लाभ 

एमएचटी-सीईटी 2025 पीसीएम ग्रुपची 5 मे रोजी फेर परिक्षा…