vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

राजर्षि शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना सन 2025-26 साठी अर्ज करण्यास मुदतवाढ…

राजर्षि शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना सन 2025-26 साठी अर्ज करण्यास मुदतवाढ…

            अमरावती, प्रतिनिधी देशातील नामांकित शैक्षणिक संस्थामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेसाठी सन 2025-26 साठी विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. तथापि शैक्षणिक संस्थामधील सन 2025-26 मधील प्रवेश प्रक्रीया अद्याप पूर्ण झालेली नाही. यासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात येत आहे. वेबसाईटवरून अर्ज डाऊनलोड करून तो परिपूर्ण व आवश्यक कागदपत्रासह दि. 30 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत पोस्टाने किंवा समक्ष समाजकल्याण आयुक्तालय, 3 चर्च रोड, पुणे-411001 येथे सादर करावेत. अर्जाचा नमुना व अधिक सविस्तर माहितीसाठी www.maharashtra.gov.in ताज्या घडामोडी या संकेतस्थळाला भेट द्यावी. अर्ज विहित नमुन्यामध्ये सादर करणे आवश्यक आहे. अपूर्ण आणि विहित मुदतीनंतर प्राप्त होणारे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, असे समाज कल्याण सहायक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी कळविले आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

बारामती पोटनिवडणुकीत मतदारांसाठी ‘ईसीआयनेट’ची सोय; उमेदवारांची सविस्तर माहिती एका क्लिकवर

साकीनाका येथे बेकायदेशीर कॉल सेंटरचा पर्दाफाश, फसवणूक करणाऱ्या सहा जणांना अटक*

vishwatmaklokswamivarta

भूमी अभिलेख कार्यालयाला अत्याधुनिक उपकरण वाटप

नागरिकांनी थंडीच्या दिवसात योग्य ती दक्षता घ्यावी- जिल्हाधिकारी 

vishwatmaklokswamivarta

जिल्हा उद्योगक केंद्राकडून विविध तांत्रिक व उद्योजकता विषयी मोफत प्रशिक्षण-इच्छुक उमेदवारांनी लाभ घेण्याचे आवाहन 

vishwatmaklokswamivarta

मतदार यादीमध्ये आपल्या नावाची नोंद योग्यरित्या झाली असल्याबाबत तपासणी करुन घ्या-जिल्हाधिकारी संतोष पाटील

vishwatmaklokswamivarta