vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

राजर्षि शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना सन 2025-26 साठी अर्ज करण्यास मुदतवाढ…

राजर्षि शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना सन 2025-26 साठी अर्ज करण्यास मुदतवाढ…

            अमरावती, प्रतिनिधी देशातील नामांकित शैक्षणिक संस्थामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेसाठी सन 2025-26 साठी विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. तथापि शैक्षणिक संस्थामधील सन 2025-26 मधील प्रवेश प्रक्रीया अद्याप पूर्ण झालेली नाही. यासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात येत आहे. वेबसाईटवरून अर्ज डाऊनलोड करून तो परिपूर्ण व आवश्यक कागदपत्रासह दि. 30 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत पोस्टाने किंवा समक्ष समाजकल्याण आयुक्तालय, 3 चर्च रोड, पुणे-411001 येथे सादर करावेत. अर्जाचा नमुना व अधिक सविस्तर माहितीसाठी www.maharashtra.gov.in ताज्या घडामोडी या संकेतस्थळाला भेट द्यावी. अर्ज विहित नमुन्यामध्ये सादर करणे आवश्यक आहे. अपूर्ण आणि विहित मुदतीनंतर प्राप्त होणारे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, असे समाज कल्याण सहायक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी कळविले आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

स्वातंत्र्यदिनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांचा गावागावातील आरोग्य समित्यांच्या सदस्यांशी थेट ऑनलाइन जनसंवाद आरोग्य व्यवस्थेमध्ये लोकसहभाग वाढविण्यावर भर

कोकण रेल्वेचे शिल्पकार, माजी रेल्वेमंत्री, केंद्रीय अर्थमंत्री, ज्येष्ठ नेते स्व. मधु दंडवते यांचे नाव सावंतवाडी रेल्वे स्थानकास देण्यास मंजुरी देण्यात आली. केंद्राच्या मान्यतेनंतर, सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे नाव ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ असे होणार आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना कडून जालना जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांना केली 

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील सात तलावांमध्ये ९७ टक्के पाणीसाठा असला, तरी तो १७ मे २०२७ पर्यंतच पुरेल, अशी माहिती पालिका प्रशासनानं दिली आहे.

vishwatmaklokswamivarta

वंजारी समाजाचा महाएल्गार: छत्रपती संभाजीनगरमध्ये ऐतिहासिक वधू-वर सूचक मेळावा; परिवर्तनाचा नवा इतिहास रचला जाणार!

vishwatmaklokswamivarta

अंतर्गत रानभाजी पदार्थ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद