vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

बेलापूर, सानपाडा आणि तुर्भे येथील व्यावसायिक मालमत्ता जप्त-नवी मुंबई महापालिकेच्या जप्ती पथकाकडून थकीत मालमत्ताधारकांवर कठोर कारवाई

बेलापूर, सानपाडा आणि तुर्भे येथील व्यावसायिक मालमत्ता जप्त-नवी मुंबई महापालिकेच्या जप्ती पथकाकडून थकीत मालमत्ताधारकांवर कठोर कारवाई

 

    नवी मुंबई प्रतिनिधी- नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागामार्फत थकबाकीदारांविरोधात जप्तीची कठोर कारवाई सुरु करण्यात आली असून ही मोहिम अधिक वेगाने राबविण्यात येत आहे. 22 जानेवारी रोजीच्या 3 मालमत्ता जप्ती कारवायांनंतर शुक्रवार दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी बेलापूर सीबीडी येथील सेक्टर 11, सानपाडा येथील सेक्टर 24 आणि तुर्भे येथील सेक्टर 19 इ येथील व्यावसायिक मालमत्तांवर महापालिकेची जप्ती कारवाई करण्यात आली आहे.

          नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त श्री. सुनील पवार व उपायुक्त डॉ.अमोल पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरामध्ये विविध भागांतील दीर्घकाळ कर थकीत असलेल्या मालमत्तांवर जप्ती पथकाकडून थेट सील व जप्तीची कारवाई करण्यात येत आहे.

          वारंवार सूचना व नोटिसा बजावूनही जे मालमत्ताधारक मालमत्ताकर भरण्यास टाळाटाळ करीत आहेत, अशा थकबाकीदारांवर कोणतीही सवलत न देता कठोर कारवाई करण्यात येत आहे. येत्या काळातही ही मोहीम अधिक गतिमान स्वरूपात सुरू राहणार आहे. तसेच जप्तीची कारवाई टाळण्यासाठी मालमत्ता कर थकबाकी असलेल्या सर्व मालमत्ताधारकांनी तात्काळ आपला थकीत मालमत्ता कर भरावा असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

000000

संबंधित पोस्ट

राज्याचे नवे राज्यपाल म्हणून जिष्णु देव वर्मा यांनी मुंबईत लोकभवन येथे घेतली शपथ

vishwatmaklokswamivarta

गोवंडीच्या बेंगणवाडीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ,एच .एम. फाउंडेशन ,आणि डॉ. आर. एन . कपूर रुग्णालय रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे भव्य आयोजन

vishwatmaklokswamivarta

नागरिकांना वापरासाठी रस्ते व पदपथ मोकळे मिळावेत याकरिता बेवारस वाहने व अनधिकृत फेरीवाले या विरोधात धडक मोहीम..

पुणे जिल्ह्यातील दुर्दैवी घटना-ऊसतोड मजुरांना घेऊन जाणाऱ्या पिकअपला कंटेनर ची जोरदार धडक दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर 12 जण गंभीर जखमी रुग्णालयात उपचार सुरू

ऐरोली परिसरात मँग्रोव्ह पार्क उभारण्यासंदर्भातअभ्यास अहवाल तयार करावा- वनमंत्री गणेश नाईक

दशसूत्री उपक्रमांतर्गत जिल्ह्यात एकाच वेळी १९२० शाळांमध्ये पालक सभा चांगले नागरिक घडविण्यासाठी संस्कार आवश्यक-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta