vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

परतवाडा येथे ‘ॲडव्हान्स ब्युटी पार्लर’ प्रशिक्षण संपन्न; 32 महिलांना प्रमाणपत्रांचे वाटप…

परतवाडा येथे ‘ॲडव्हान्स ब्युटी पार्लर’ प्रशिक्षण संपन्न; 32 महिलांना प्रमाणपत्रांचे वाटप…

व्यावसायिक प्रतिनिधी-

     अमरावती,  अचलपूर तालुक्यातील परतवाडा येथे ‘ॲडव्हान्स ब्युटी पार्लर’ प्रशिक्षण बॅचचा निरोप समारंभ नुकताच उत्साहात पार पडला. 1 जानेवारी ते 6 फेब्रुवारी 2026 या कालावधीत राबविण्यात आलेल्या या एक महिन्याच्या विशेष प्रशिक्षणाचा समारोप प्रमाणपत्र वितरण सोहळ्याने करण्यात आला. या उपक्रमाचा एकूण 32 महिला लाभार्थ्यांनी लाभ घेतला.

     या कार्यक्रमाला विभागीय व्यवस्थापक प्रवीण कोळेश्वर, उपव्यवस्थापक ऋषिकेश कथलकर, एमसीडी प्रकल्प अधिकारी राजेश सुने, आयोजक गणेश बहाड आणि प्रशिक्षिका जोत्स्ना राऊत उपस्थित होते. यावेळी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सर्व 32 महिलांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली

   विभागीय व्यवस्थापक प्रवीण कोळेश्वर यांनी महिलांना मार्गदर्शन करताना स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्याचे आवाहन केले. तसेच, व्यवसाय उभारणीसाठी ‘अमृत’ आणि ‘एमसीडी’ मार्फत सर्वतोपरी पाठबळ दिले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले

प्रकल्प अधिकारी राजेश सुने यांनी लाभार्थ्यांना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेची माहिती देऊन या योजनेच्या माध्यमातून अर्थसाहाय्य मिळवून आपला व्यवसाय यशस्वी कसा करावा, याचे तंत्र समजावून सांगितले.

    कार्यक्रमादरम्यान लाभार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना या प्रशिक्षणामुळे आत्मविश्वास वाढला असल्याचे सांगितले. प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरल्याची भावना महिलांनी व्यक्त केली.काही महिलांनी स्वतःचा व्यवसायदेखील सुरू केला आहे.

 

0000000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र नवनिर्माण सेना कडून जालना जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांना केली 

vishwatmaklokswamivarta

कर्मांचा न्याय अटळ; आत्मपरीक्षण व धर्माचरणातूनच मोक्षप्राप्ती : महासती श्री निर्मलाजी म.सा.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सुपा येथे आगमन व स्वागत…

vishwatmaklokswamivarta

विशेष सखोल पुनरिक्षण; मतदार मॅपिंगचे काम दि.१० पर्यंत पुर्ण करण्याचे निर्देश

डोंगरी महोत्सव कालावधीत चोख पोलीस राहणार एसटीच्या जादा बसेस सोडणार- पालकमंत्री शंभूराज देसाई

देशातील सर्वात मोठी सोलर इकोसिस्टीम नागपुरात; उद्योजकांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांचा उद्योजकांसोबत संवाद

vishwatmaklokswamivarta