vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईवरळी परिसरात घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचा काळाबाजार करणाऱ्या टोळीवर शिधावाटप विभागाने धडक कारवाई

मुंबईवरळी परिसरात घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचा काळाबाजार करणाऱ्या टोळीवर शिधावाटप विभागाने धडक कारवाई

मुंबई प्रतिनिधी-वरळी परिसरात घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचा काळाबाजार करणाऱ्या टोळीवर शिधावाटप विभागाने धडक कारवाई करत मोठा साठा जप्त केला.

वरळी नाका येथील गणपतराव कदम मार्गावरील ‘सूरज वल्लभदास चाळ’ परिसरात गॅस सिलेंडरची अवैध साठेबाजी करून चढ्या दराने विक्री केली असल्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली.

यामध्ये एचपी गॅस कंपनीचे पाच किलोचे सहा भरलेले आणि ५८ रिकामे सिलेंडर हस्तगत करण्यात आले. तसेच सुपर गॅस कंपनीचे चार किलोचे ६४ भरलेले आणि १२ किलोचे १९ भरलेले सिलेंडर जप्त करण्यात आले. याशिवाय बारा, चार आणि दोन किलोचे विविध आकाराचे २५ रिकामे सिलेंडरही आढळून आले.

नियंत्रक शिधावाटप कार्यालयाच्या फिरत्या पथकाने आणि कार्यालय क्रमांक २१ च्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.

00000

संबंधित पोस्ट

शिवद्रोही प्रशांत कोरटकरला अटक कराअन्यथा राज्याभरात तीव्र आंदोलन, मराठा क्रांती मोर्चा, शिवप्रेमी संघटनांचे धरणे आंदोलन

राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांच्या अर्जावर बैठकीत सविस्तर चर्चा  धर्मनिरपेक्षता व शहराच्या सर्वांगीण विकासाचा मुद्दा महत्त्वाचा : अरविंद चव्हाण 

vishwatmaklokswamivarta

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया 15 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार

vishwatmaklokswamivarta

अल्पसंख्याक संस्था दर्जा प्रमाणपत्र प्रकरणाची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस पावले उचलावीत

इग्नाईट कन्व्हेन्शनमधून मुंबई उपनगराच्या उद्योजकता विकासाला नवी दिशा

vishwatmaklokswamivarta