vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मॅग्नेट’ प्रकल्पांतर्गत 32 शेतकऱ्यांचा राज्यस्तरीय अभ्यास दौरा

मॅग्नेट’ प्रकल्पांतर्गत 32 शेतकऱ्यांचा राज्यस्तरीय अभ्यास दौरा

    अमरावती, प्रतिनिधी : महाराष्ट्र अँग्री बिझनेस नेटवर्क प्रकल्पांतर्गत शेतकरी अभ्यास दौरा व प्रक्षेत्र भेटी दि. 16 ते 18 मार्च कालावधीत पार पडल्या. प्रकल्पाच्या ‘बाजार विकास व प्रोत्साहन’ घटकांतर्गत दौऱ्यात 32 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.

    या दौऱ्यात शेतकऱ्यांना शेतमाल प्रक्रिया, ब्रँडिंग, पॅकेजिंग आणि जागतिक बाजारपेठेतील संधींबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

    शेतकऱ्यांनी चिखली येथील ‘आभाळमाया शेतकरी उत्पादक कंपनी’ला भेट दिली. येथे भाजीपाला व फळे प्रक्रिया उद्योग, निर्यातीच्या संधी आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाबद्दल प्रत्यक्ष माहिती घेतली. त्यानंतर बदनापूर, जालना येथील मोसंबी संशोधन केंद्र आणि कृषी विज्ञान केंद्राला भेट देऊन फळबाग व्यवस्थापना विषयी माहिती घेतली. सिन्नर येथील कृषक मित्र ॲग्रो सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड येथे भेट देऊन परदेशातील निर्यात संधींची माहिती घेतली. त्यानंतर सह्याद्री फार्म्सला भेट देऊन शेतकरी बळकटीकरण, मूल्यवर्धन आणि मोठ्या प्रमाणावरील निर्यात साखळीचे प्रात्यक्षिक पाहिले. तसेच जैन हिल्स, जळगाव येथील टिश्यू कल्चर कंपनीला भेट देऊन केळीच्या महिला बळकटीकरण, नवीन जाती आणि दर्जेदार रोपांविषयी माहिती घेतली. जैन इरिगेशनमधील आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि संशोधन कार्याची माहिती घेऊन जैन फूड पार्कमधील प्रक्रिया केंद्राला भेट दिली.

   दौऱ्यामुळे शेतकऱ्यांना शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहण्याची दृष्टी मिळाली आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि थेट बाजारपेठेशी जोडले गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात शाश्वत वाढ होण्यास मदत होणार आहे, असा विश्वास प्रकल्प उपसंचालक अरुण नादरे यांनी व्यक्त केला. सदर अभ्यास दौरा प्रकल्प संचालक विनायक कोकरे, अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ. अमोल यादव यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. दौऱ्यासाठी कृषि व्यवसाय तज्‍ज्ञ अक्षय गणेशपुरे आणि विद्या पुंड यांनी समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडली.

0000000

संबंधित पोस्ट

जमिन मुल्यांकन विषय चिघळण्याच्या मार्गावर आजुनही वेळ गेलेली नाही, प्रशासनाल 4 तारखेची डेडलाईन-दिलीप राठी* 5 तारखेला शेकडो शेतकरी आत्मदहन करणार* जिल्हाधिकारी, एसडीएम यांच्या एसीबी चौकशीवर ठाम

vishwatmaklokswamivarta

अंमली पदार्थ मुक्त सांगली जिल्ह्यासाठी प्रत्येक विभागाने सकारात्मक योगदान द्यावे – एनकॉर्ड समितीची बैठक संपन्न- संयुक्त पथकाने दर महिन्याला तपासणी करावी- कारखान्यांकडून प्रतिज्ञापत्र घेण्याचे निर्देश..

vishwatmaklokswamivarta

गोड्या पाण्यातील मासेमारी वाढवण्यासाठी धोरण तयार करावे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मत्स्य व्यवसाय विभागाच्या १०० दिवसाच्या नियोजनाचा घेतला आढावा

vishwatmaklokswamivarta

पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी शासनाचा दिलासा;परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णयशैक्षणिक संस्थांनी पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदतीसाठी पुढे यावे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे आवाहन

जिल्हाधिकाऱ्यांकडून विविध महसूली कामांचा आढावा;फार्मर आयडी तयार करण्यासाठी विशेष मोहिम राबवा- जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

कारखाने अधिनियमातील दुरुस्तीला मंत्रिमंडळाची मान्यता – कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांची माहिती कामगारांना अधिकचा आर्थिक लाभ मिळणार

vishwatmaklokswamivarta