vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सांगलीच्या जिल्हाधिकारीपदी डॉ. मैनाक घोष रुजू-मावळते जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची पदोन्नतीने बदली

सांगलीच्या जिल्हाधिकारीपदी डॉ. मैनाक घोष रुजू-मावळते जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची पदोन्नतीने बदली

 सांगली, प्रतिनिधी : राज्य शासनाच्या आदेशानुसार सांगलीच्या जिल्हाधिकारीपदी डॉ. मैनाक घोष यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी आज मावळते जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्याकडून पदभार स्वीकारला. पदहस्तांतरणवेळी श्री. काकडे यांनी श्री. घोष यांचे स्वागत करून त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

 यावेळी सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासास कटिबद्ध असून, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिक अशा सर्वांना सोबत घेऊन विकसित सांगली जिल्हा 2030 व 2047 चे उद्दिष्ट समोर ठेवून वाटचाल करणार असल्याचा मनोदय नूतन जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी व्यक्त केला.

 महसूल विभागाच्या वतीने नूतन जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांचे अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर यांनी स्वागत केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. तसेच, दिवसभरात विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनीही नूतन जिल्हाधिकारी डॉ. घोष यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

नूतन जिल्हाधिकाऱ्यांचा परिचय डॉ. मैनाक घोष हे मूळचे पश्चिम बंगाल येथील असून, त्यांनी झूलॉजीमध्ये पदव्युत्तर पदवीचे शिक्षण प्राप्त केले आहे. तसेच, बायोकेमिस्ट्री विषयात पीएच. डी पदवी प्राप्त केली आहे. ते भारतीय प्रशासन सेवेतील 2019 च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे अधिकारी आहेत. त्यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी, रायगड येथून प्रशासकीय कारकिर्दीची सुरवात केली. आतापर्यंत त्यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नंदुरबार व गडचिरोली, तसेच, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यवतमाळ व धाराशिव येथे कामकाज पाहिले आहेमावळत्या जिल्हाधिकाऱ्यांचा सांगली पॅटर्न दरम्यान, मावळते जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची पदोन्नतीने व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य कृषि औद्योगिक विकास महामंडळ, मुंबई येथे बदली झाली आहे. आपल्या जिल्हाधिकारी पदाच्या कार्यकालात सांगलीने अनेक चांगले अनुभव दिले असून, सांगलीच्या स्मृती सदैव स्मरणात राहतील, अशा भावना मावळते जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी व्यक्त केल्या.

 श्री. काकडे यांनी त्यांच्या कार्यकाळात सांगली पॅटर्न अंतर्गत विविध लोकाभिमुख उपक्रम राबवले. यामध्ये घरेलु कामगार आरोग्य तपासणी, दिव्यांगांना यूडीआयडी कार्ड वाटप, मूकबधीर विद्यार्थ्यांना रोबॉटिक्स प्रशिक्षण, निरीक्षणगृहातील मुलांनी तयार केलेल्या वस्तुंचे प्रदर्शन, एचआयव्ही बाधितांचा वधूवर मेळावा, शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चांगला दर मिळण्यासाठी बायर सेलर मीट व ई मार्केटिंग अशा अनेक उपक्रमातून त्यांनी शेतकरी व समाजाच्या विविध स्तरातील गरजू घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या उपक्रमांची दखल घेऊन त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले

00000

संबंधित पोस्ट

शारीरिक तंदुरुस्तीसाठी खेळ महत्त्वाचे – प्रा. मोहन नेहरे  

vishwatmaklokswamivarta

आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे – विभागीय आयुक्त नयना गुंडे जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष 24×7 तास कार्यान्वित ठेवा

धर्माची शिकवण आणि आपत्तीत मदतीचा हात…!

vishwatmaklokswamivarta

सोशल मीडिया’ वरील संशोधनासाठी माहिती संचालक किशोर गांगुर्डे यांना पीएच.डी.

पुढील शैक्षणिक वर्षापासून चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एसटीच्या एनसीएमसी स्मार्ट कार्डचे लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती