vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

खुलताबाद कडे जाणाऱ्या वाहतुक मार्गात बदल

खुलताबाद कडे जाणाऱ्या वाहतुक मार्गात बदल

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी येत्या २ एप्रिल रोजी हनुमान जयंती असल्याने खुलताबाद येथील भद्रा मारोती मंदीर येथे हनुमन जन्मोत्सव साजरा केला जातो. त्यानिमित्त तेथे मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतात. त्यामुळे तेथे रहदारी सुरळीत रहावी यासाठी या मार्गावरील जड वाहतुक मार्गात दि.१ ते ३ एप्रिल या कालावधीकरीता बदल करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी निर्गमित केले आहेत.

बदलेले वाहतुक मार्ग याप्रमाणे- १. कन्नड, वेरुळ, खुलताबाद, दौलताबाद मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी वाहने कन्नड, वेरुळ, कसाबखेड फाटा, वरझडी, माळीवाडा, शरनापुर फाटा मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे जातील.

२. छत्रपती संभाजीनगर, दौलताबाद, खुलताबाद, वेरुळ मार्गे कन्नडकडे जाणारी वाहने छत्रपती संभाजीनगर, शरनापुर फाटा, माळीवाडा, वरझडी, कसाबखेडा फाटा, वेरुळ मार्गे कन्नडकडे जातील.

३. फुलंब्री, सुलतानपुर, खुलताबाद, वेरुळमार्गे कन्नडकडे जाणारी वाहने फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर, शरनापुर फाटा, माळीवाडा, वरझडी, कसाबखेड फाटा, वेरुळ मार्गे कन्नड कडे जातील.

०००००

संबंधित पोस्ट

राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन, उद्यापासून नागपूरमध्ये , अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांकडून चहापानाचं आयोजन. 

vishwatmaklokswamivarta

महापुरुषांचा विचार ढणढनत ठेवायचा असेल तर चुल्हीत सतत विचारांची लाकडं घालावी लागतिल…आ सिद्धार्थ खरात

महाशिवरात्र यात्रा; वेरुळ मध्ये वाहनांना प्रतिबंध..

vishwatmaklokswamivarta

8 एप्रिल रोजी दुसऱ्या विशेष डिजिटल शेती शाळेचे आयोजन ; कृषि विभाग व पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने आयोजित

कार्यकारी अभियंत्याला शिवसैनिकांचा घेराव वीज ग्राहकांना दिलेली जास्तीची बिले तातडीने रद्द करा – जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर कार्यकारी अभियंत्यांना विजेच्या प्रश्नांवरून घेराव स्मार्ट मीटर बसविण्याची योजना खाजगी कंपनीच्या फायद्यासाठी.

गॅस वितरणातील त्रुटी दूर करण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना राबवाव्यात – पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील