vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधीस्थानिक बातम्या

पी.आर. जॅग्वार्सने पटकावला टीडब्ल्यूपीएल चषक-खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण  

पी.आर. जॅग्वार्सने पटकावला टीडब्ल्यूपीएल चषक-खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण

ठाणे प्रतिनिधी- खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाला संलग्न असलेल्या ठाणे वॉर्ड क्रिकेट कमिटीच्या वतीने ठाण्यातील पोलिस मैदान येथे आयोजित टीडब्ल्यूपीएल क्रिकेट स्पर्धेत पी.आर. जॅग्वार्सने व्ही.पी. पँथर्स संघाला पराभूत करत चषकावर नाव कोरले.

टीडब्ल्यूपीएलचा अंतिम सामना व्ही.पी. पँथर्स विरुद्ध पी.आर. जॅग्वार्स या दोन संघात रंगला. पी.आर. जॅग्वार्ससाठी प्रथम फलंदाजी करत ५ गडी बाद ६७ धावा केल्या. मात्र लक्ष्याचा पाठलाग करताना व्ही.पी. पँथर्स ने ५ गडी बाद ५९ धावा केल्या. पी.आर. जॅग्वार्स संघाने हा अंतिम सामना ८ धावांनी जिंकला. सामनावीर म्हणून विक्रम विश्वकर्मा (पी.आर. जॅग्वार्स) तर इंडिया आयकॉन मॅन ऑफ द सिरीज विवेक शेलार, ठाणे आयकॉन मॅन ऑफ द सिरीज जुगेश यादव यांचा सन्मान करण्यात आला.

पारितोषिक वितरण समारंभाला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के उपस्थित होते. यावेळी शिवसेनेच्या महिला संघटक मीनाक्षी शिंदे, शिवसेना गटनेते पवन कदम, नगरसेवक मंदार केणी, युवासेना कार्यकारिणी सदस्य अर्जुन डाभी, नितीन लांडगे, मिलिंद चव्हाण, किरण जाधव, नितेश पाटोळे, पी. आर. जग्वार्स संघाचे मालक रोहित पिंपळकर, प्रकाश कोटवानी, व्ही पी पँथर्स संघाचे मालक विशाल जाधव, ठाणे वॉर्ड क्रिकेट कमिटीचे अध्यक्ष निखिल बुडजडे, उपाध्यक्ष अभिजित पवार यांच्यासह स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते आणि मान्यवर मंडळी उपस्थित होते.

00000

संबंधित पोस्ट

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने बुलढाण्यात महिला मॅरेथॉनचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबईचा सर्वांगीण विकास व्हावा याला आम्ही कायमच प्राधान्य दिले आहे. येथील भूमिपुत्रांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याचा निर्णय आम्ही घेतला – एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनाप्रमुख

vishwatmaklokswamivarta

अन् अंबडच्या जिल्हा परिषद शाळेत १९७२ च्या आठवणींना उजाळाअंबड जि.प. प्रशालेच्या १९७२ चे गेटू-गेदर :१९७२ च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचे स्नेहमिलन..

vishwatmaklokswamivarta

बहाई धर्मगुरू दिव्यात्म बाब यांचा श्रद्धांजलीपर बलिदान दिवस साजरा

शिरूर येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू

जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक संपन्न,केंद्र व राज्य शासनाच्या योजना सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रभावीपणे कामकाज करावे – खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta