vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

श्रीक्षेत्र चोंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त भव्य जयंती महोत्सव*

*श्रीक्षेत्र चोंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त भव्य जयंती महोत्सव*

राज्य प्रतिनिधी-पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त श्रीक्षेत्र चोंडी येथे दि. २९, ३० व ३१ मे २०२६ दरम्यान भव्य जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.या ऐतिहासिक महोत्सवात भव्य दीपोत्सव, कवी संमेलन, ड्रोन शो, महाअभिषेक, महाप्रसाद तसेच मुख्य जयंती समारोह व अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले असून देशभरातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

याप्रसंगी राजस्थानचे राज्यपाल मा. श्री. हरिभाऊ बागडे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री मा. ना. श्रीमती सुनेत्राताई पवार, पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री मा. श्रीमती पंकजाताई मुंडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री मा. ना. श्री. जयकुमार गोरे, कृषी मंत्री मा. ना. श्री. दत्तात्रय भरणे, इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण मंत्री मा. ना. श्री. अतुल सावे, अहिल्यानगरचे पालकमंत्री मा. श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह मंत्रीमंडळातील मान्यवर सदस्य तसेच विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

शुक्रवार दि.२९ मे रोजी सायंकाळी ७.०० वाजता आमदार मा. श्री. गोपीचंद पडळकर यांच्या संकल्पनेतून मातोश्री श्रीमती भामाबाई शंकरराव शिंदे यांच्या शुभहस्ते मंदिरावरील विद्युत रोषणाई व भव्य दीप महोत्सवाचे उदघाट्न होणार आहे.

शनिवार दि. ३० मे रोजी भव्य कवी संमेलनाचे आयोजन केले आहे. या कवी संमेलनात युगकवी डॉ. कुमार विश्वास, अभिनेत्री गिरिजा ओक, कवयित्री डॉ. भुवन मोहिनी, साक्षी तिवारी, शिखा अवधेश, श्रद्धा शौर्य, सान्या राय, नेहा गोडघाटे आपल्या काव्य सादरीकरणाने उत्सवाची शोभा वाढवणार आहेत.यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनपटावर आधारित भव्य ड्रोन शो आणि मध्यरात्री आतषबाजी होणार आहे.

रविवार दि. ३१ मे रोजी राजस्थानचे राज्यपाल मा. श्री. हरिभाऊ बागडे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्यासमवेत अहिल्येश्वर मंदिरात महाअभिषेक संपन्न होणार असून सकाळी ९ वाजल्यापासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सकाळी ११ वाजता मान्यवर

संबंधित पोस्ट

रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांनी 30 नोव्हेंबरपर्यंत पाणी मागणी अर्ज करावे

vishwatmaklokswamivarta

समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा – २०२५समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा – २०२५

vishwatmaklokswamivarta

श्रीराम कृष्ण सेवा ट्रस्ट कल्याण तर्फे गरजूना अन्न धान्य व ब्लेन्केट वाटप

vishwatmaklokswamivarta

उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणून खबरदारी घेण्याचे नवी मुंबई महानगरपालिकेचे आवाहन*

संरक्षणमंत्र्यांनी नाशिकमध्ये एचएएलच्या स्मार्ट टाऊनशिपचे केले अनावरण

vishwatmaklokswamivarta

पहलगाम घटना; अडकलेल्या प्रवाशांसाठी विशेष रेल्वे…