vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

निवडणूक निरीक्षक डॉ. माधवी खोडे-चवरे नांदेडमध्ये दाखल

निवडणूक निरीक्षक डॉ. माधवी खोडे-चवरे नांदेडमध्ये दाखल

नांदेड प्रतिनिधी :- नांदेड विधान परिषदेच्‍या स्‍थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या व्दिवार्षीक निवडणूक-2026 साठी भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या निवडणूक निरीक्षक डॉ. माधवी खोडे-चवरे (भाप्रसे) यांचे 1 जून रोजी नांदेड येथे आगमन झाले. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयास भेट देऊन निवडणूक विषयक कामकाजाची पाहणी केली.

त्यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या कामकाजाबाबत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्यासह निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांशी याप्रसंगी चर्चा केली. तसेच विविध निवडणूक कक्षासह, प्राप्त नामनिर्देशन अर्ज व मतदार यादीबाबत माहिती घेतली.

येथील स्नेहनगर शासकीय विश्रामगृहात निवडणूक काळात त्या थांबणार आहेत. नागरिकांना नांदेड विधान परिषदेच्‍या निवडणुकी संदर्भात असणाऱ्या समस्यांबाबत 2 ते 4 जून , 12 ते 14 जून आणि 17 ते 22 जून 2026 या कालावधीत त्यांच्याशी संपर्क साधला जाऊ शकतो. त्यांचा ई-मेल आयडी observer.mlc.ned@gmail.com आहे. त्यांचा संपर्क क्र. 9637228955 आहे.

00000

संबंधित पोस्ट

विविध कल्याणकारी उपक्रम, योजनांवर राष्ट्रीय पोस्टर डिझाईन स्पर्धा सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांची घोषणा

vishwatmaklokswamivarta

सांगलीत आयर्विनचा समांतर पूल सार्वजनिक वापरासाठी खुला…

vishwatmaklokswamivarta

…पुढील ३ तासात मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाच्या सरींसह ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळीवारे वाहण्याची दाट शक्यता… हवामान खात्याचा अंदाज

vishwatmaklokswamivarta

पाच वर्षांच्या खंडानंतर कैलास मानसरोवर यात्रा आजपासून सुरु.

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमांतर्गत फेलोंना मिळणार‘आयआयटी’ बॉम्बेचे मार्गदर्शन सार्वजनिक धोरण प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी राज्य शासन व ‘आयआयटी’ बॉम्बेमध्ये सामंजस्य करार

जिल्हास्तरीय संस्कृत स्पर्धेत प्रणवी भिसेचा प्रथम क्रमांक.

vishwatmaklokswamivarta