vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे लोकभवन येथे स्वागत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे लोकभवन येथे स्वागत-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

मुंबई, प्रतिनिधी: म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग भारत दौऱ्यावर आले असून त्यांनी आज लोकभवन येथे भेट दिली. यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी त्यांचे स्वागत केले. म्यानमार राष्ट्राध्यक्षांच्या सन्मानार्थ लोकभवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यपालांच्या पत्नी सुधा देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांच्या समवेत त्यांचे शिष्टमंडळ आलेले आहे. त्यामध्ये राष्ट्रपती कार्यालयाचे केंद्रीय मंत्री खिन माउंग यी, परराष्ट्र व्यवहार मंत्री टिन माउंग स्वे, वित्त आणि महसूल मंत्री डॉ. कान झॉ, कृषी मंत्री मिन नाउंग, उद्योग आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग विकास मंत्री डॉ. चार्टी थान, म्यानमारच्या मध्यवर्ती बँकेचे गव्हर्नर डॉ. खिन नाइंग ऊ, संरक्षण दलातील लेफ्टनंट जनरल मो म्यिंट स्वे, राष्ट्रीय नियोजन, गुंतवणूक आणि परकीय आर्थिक संबंध मंत्री यू थंत सिन ल्विन, स्थलांतर आणि लोकसंख्या मंत्री डॉ. खाइंग खाइंग सो, वाणिज्य मंत्री मिन मिन आणि म्यानमारमधील भारताचे राजदूत झॉ ऊ यांचा समावेश आहे.

कार्यक्रमास कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, भारताचे म्यानमारमधील राजदूत अभय ठाकूर, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, मरिटाईम एअर ऑपरेशन्सचे एअर ऑफिसर कमांडिंग एअर व्हाइस मार्शल प्रशांत शरद वडोदकर आदी उपस्थित होते.

0000

संबंधित पोस्ट

लातूरच्या उदगीरमध्ये ‘पैशांचा पाऊस’ पाडण्याच्या अंधश्रद्धेतून अघोरी विधी करण्याचा प्रयत्न; उदगीर ग्रामीण पोलिसांकडून १३ आरोपींना अटक

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाला साजेशी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा घ्या – उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीमध्ये १५ ते १९ दरम्यान स्पर्धेचे आयोजन

जनगणना 2027 अंतर्गत दिल्ली येथील महारजिस्ट्रार कार्यालयाच्या पथकाची जालना जिल्ह्यास भेट दिल्ली येथील पथकाकडून जालना जिल्ह्यातील जनगणनेच्या कामकाजाचे कौतुक….

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ‘पत्रकार संवादिका’ पुस्तिका, घडीपत्रिकेचे प्रकाशन

सुशासनासाठी नागरिकांना सेवा संवेदनशील आणि गतिशीलतेने द्याव्यात- विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर.

vishwatmaklokswamivarta

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल जाहीर, एकूण निकाल ८९ पूर्णांक ७९ शतांश टक्के. ..