vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

थ्री आर’ संकल्पनेंतर्गत इयत्ता नववी, दहावीचे सुस्थितीतील पाठ्यपुस्तक संच आदिवासी आश्रमशाळेला भेट

‘थ्री आर’ संकल्पनेंतर्गत इयत्ता नववी, दहावीचे सुस्थितीतील पाठ्यपुस्तक संच आदिवासी आश्रमशाळेला भेट

 

     नवी मुंबई प्रतिनिधी- नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळांमधील इ.नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी वापरलेली पाठ्यपुस्तके संकलित करून त्याचे पुस्तक संच रयत शिक्षण संस्थेच्या आदिवासी आश्रम शाळांतील विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकरिता पाठविण्याचा पर्यावरणशील अभिनव उपक्रम प्रभात ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात राबविण्यात आला.

  महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या शुभहस्ते मोखाडा आश्रम शाळेचे प्रतिनिधी श्री.दीपक काशीकर यांच्याकडे प्रभात ट्रस्ट संस्थेचे प्रमुख डॉ.प्रशांत थोरात यांच्या उपस्थितीत हे पुस्तक संच देण्यात आले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार व डॉ.राहुल गेठे, शिक्षण विभागाच्या उपआयुक्त श्रीम. संघरत्ना खिल्लारे, परिमंडळ 1 उपआयुक्त श्री.सोमनाथ पोटरे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.राजेश म्हात्रे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे, क्रीडा विभागाच्या उपआयुक्त श्रीम.अभिलाषा म्हात्रे, मुख्य विधी अधिकारी श्री.अभय जाधव व इतर अधिकारी उपस्थित होते.

   जागतिक पर्यावरण दिनाला साजेसा हा अभिनव उपक्रम ‘थ्री आर’ अर्थात कचरा कमी करणे (Reduce), कच-याचा पुनर्वापर (Reuse) आणि कच-यावर पुनर्प्रक्रिया (Recycle) या पर्यावरणपूरक संकल्पनेवर आधारित आहे. यामध्ये वापरलेली पुस्तके पुन्हा वापरात आणून सुविधांचा अभाव असणा-या आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची नवी प्रेरणा मिळणार आहे. या सोबतच जुन्या पुस्तकांचा पुनर्वापर होत असल्याने कागदी कचरा कमी होणार आहे.

    नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांतून इ. नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी वापरलेल्या सुस्थितीतील पुस्तकांचे 1 हजारहून अधिक संच संकलित करण्यात येत असून पहिल्या टप्प्यात जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून 100 संच देण्यात आले आहेत. आणखी एक विशेष बाब म्हणजे प्रभात ट्रस्टच्या माध्यमातून ‘आता थांबायचं नाय’ या चित्रपटापासून प्रेरणा घेऊन यावर्षी राबविण्यात आलेल्या उपक्रमांतर्गत 11 कचरा वेचक महिला दहावीची शालान्त बोर्ड परीक्षा उत्तीर्ण झालेल्या असून त्यांनी याच पुस्तक संचाचा उपयोग केलेला आहे.

     एक वर्षभर अभ्यासासाठी वापरलेली जुनी पाठ्यपुस्तके उत्तीर्ण होऊन पुढच्या इयत्तेत गेल्यानंतर टाकून न देता त्याचा उपयोग इतरांना अभ्यासासाठी होऊ शकतो ही संकल्पनाच सामाजिक भावना जपणारी असून नवी मुंबईकर पालकांनी याचा विचार करून आपल्या पाल्यांसाठी या संकल्पनेचा उपयोग करावा आणि ‘थ्री आर’ चा अंगिकार करावा असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी यावेळी केले

0000

संबंधित पोस्ट

किमान आधारभूत किंमत खरेदी योजनाऑनलाईन नोंदणीसाठी 31 डिसेंबरची मुदत 

vishwatmaklokswamivarta

 अरुणोदय तर्फे आठ फेब्रुवारी एमआयजी मध्ये चालण्याची स्पर्धा

vishwatmaklokswamivarta

सत्कार नामांतरलढ्यातील विराचा….**रिपब्लिकन ज्येष्ठ नेते डी एम चव्हाण यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त आज  सत्कार समारंभ* 

मुंबईतील कबुतरांना नियंत्रित खाद्य पुरवण्याचा निर्णय नागरिकांवर, आजपासून हरकती, सूचना नोंदवता येणार…

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त-माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाची मानवंदना,महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

दलित आयपीएस अधिकारी पुरण कुमार यांच्या आत्महत्येस जबाबदार अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्याच्या मागणीसाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली मुख्यमंत्री नायबसिंह सैनी यांची भेट… दिवंगत पुरण कुमार यांच्या कुटुंबीयांची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली सांत्वनपर भेट

vishwatmaklokswamivarta