vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

कोरेगाव येथील शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्याचे आवाहन

कोरेगाव येथील शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्याचे आवाहन

सातारा प्रतिनिधी: सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतीगृह कोरेगांव जि सातारा या मुलांच्या वसतीगृहामध्ये शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या वसतीगृहामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती-भटक्या जमाती, इतर मागास वर्ग, आर्थिकदृष्टया मागास घटक तसेच विशेष मागास प्रवर्गातील विदयार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जातो. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा.

 वसतीगृहामध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांकरिता मोफत निवास व भोजनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. याशिवाय मासिक निर्वाह भत्ता, शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी तसेच गणवेशासाठी आर्थिक साहाय्य प्रदान केले जाते. शैक्षणिक वर्ष 2026-27 करिता शासकीय वसतीगृहामधील प्रवेश हे ऑनलाईन पद्धतीने होणार असून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत होणाऱ्या वसतीगृह प्रवेशाचे अर्ज हे https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर स्वीकारण्यात येणार आहेत.

वसतीगृह प्रवेशाबाबत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताना कोणतीही अडचण उद्भवल्यास सर्व अडचणींचे निराकरण करुन विद्यार्थी प्रवेश निश्चित होण्यासाठी सर्वतोपरी सहाय्य केले जाईल. याकरिता थेट वसतीगृहामध्ये संपर्क साध्ण्याचे आवाहन वसतीगृह अधीक्षक आशिष शिंदे यांनी केले आहे.

 

0000

संबंधित पोस्ट

केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते दिल्लीत राष्ट्रीय एफपीओ बैठक 2025 चे

vishwatmaklokswamivarta

नांदेड भक्तिमय ; हिंद- दी- चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम कार्यक्रमात  लाखो भाविक नतमस्तक

vishwatmaklokswamivarta

कराड व कोयनानगर येथे आपत्ती व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन

घरेलु कामगार आरोग्य तपासणी अभियानातील महिला रूग्णांवर पूर्णपणे मोफत उपचार करावेत  – जिल्हाधिकारी अशोक काकडे

vishwatmaklokswamivarta

19 फेब्रुवारीला शिवजयंती निमित्ताने“जय शिवाजी जय भारत”पदयात्रेचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

अड. देसाई क्रिडांगणात कै. महेश मोरे यांच्या स्मरणार्थ क्रिकेट टुर्नामेंट संपन्न

vishwatmaklokswamivarta