vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पीएम सेतू योजनाःऔद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे उन्नतीकरण;रोजगारक्षम कौशल्यासाठी जिल्ह्यातील उद्योगांचा सहभाग

पीएम सेतू योजनाःऔद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे उन्नतीकरण;रोजगारक्षम कौशल्यासाठी जिल्ह्यातील उद्योगांचा सहभाग

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- प्रधानमंत्री सेतू या योजनेअंतर्गत औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे उन्नतीकरण करुन रोजगारक्षम कौशल्य विकास करण्यात येणार आहे. त्यासाठी उद्योगांचा सहभाग घेतला जाणार आहे. जिल्ह्यातील पाच औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची या योजनेसाठी निवड करण्यात आली असून सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होणार आहे.

यासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., सहसंचालक व्यवसाय शिक्षण प्रदीप दुर्गे, उपसंचालक रमण पाटील, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी अभिजीत आलटे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार सत्यभूषण गोसावी आदी उपस्थित होते.

पीएम सेतू ही केंद्र पुरस्कृत योजना असून औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे उन्नतीकरण करुन त्यांचे आधुनिक, उद्योगाभिमुख व रोजगारक्षम कौशल्य संस्थांमध्ये रुपांतरीत करणे हा उद्देश आहे. त्यानुसार जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था छत्रपती संभाजीनगर आणि पैठण,गंगापुर, फुलंब्री व खुलताबाद येथील आयटीआय अशा पाच संस्थांचे मिळून एक क्लस्टर विकसित केले जाणार आहे. या पाच आयटीआय मध्ये मिळून शिकणाऱ्या सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांना या रोजगारक्षम कौशल्य विकास प्रशिक्षणाचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी केंद्र शासनाचा ५० टक्के, राज्य शासनाचा ३३ टक्के व उद्योगांचा १७ टक्के निधी खर्च केला जाणार आहे. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात विकसित करावयाच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची निवड झाली असून पुढील टप्प्यात उद्योगांचा सहभाग मिळविला जाणार आहे. त्यासाठी एमआयडीसी, जिल्हा उद्योग केंद्र आणि कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत संयुक्त प्रयत्न केले जातील.उद्योगांशी समन्वय तयार करुन उद्योगांना आवश्यक कौशल्यनुसार रोजगारक्षम अभ्यासक्रम तयार करुन विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाईल,असे यावेळी सांगण्यात आले.

०००००

संबंधित पोस्ट

अवैध वाळू उत्खननाविरोधात तहसील प्रशासन व ग्रामीण पोलिसांची संयुक्त धडक कारवाई २७ लाखांचा मुद्देमाल नष्ट ..

गोसीखुर्द प्रकल्पग्रस्ताच्या पुनर्वसनाबाबतचे प्रश्न सोडविणार – राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

सुषमा स्वराज या अष्टपैलू प्रतिभावंत राजकारणी – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

शालेय अभ्यासक्रमात श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या बलिदानाच्या इतिहासाचा समावेश करणार; नवी मुंबईत त्यांच्या नावाने रुग्णालय उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत हिंद दि चादर कार्यक्रमाचे खारघरमध्ये भव्य आयोजन

महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत अमरावती विभागाने राज्यस्तरावर नावलौकिक मिळवावा – पालकमंत्री संजय राठोड पालकमंत्र्याच्या हस्ते विभागीय महसूल महोत्सवाचे उद्घाटन

मराठवाड्याची कुणबी प्रमाणपत्र वाटपात मोठी झेप ! ३ लाख १६ हजारांहून अधिक प्रमाणपत्रे वितरित,जात पडताळणीची १६ हजार ११० प्रकरणे निकाली ; एसईबीसीची २ लाख ९५ हजार ३०५ प्रमाणपत्रे वितरित

vishwatmaklokswamivarta