vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

दहावीची परीक्षा संपली आता 11 प्रवेशासाठी ; कागदपत्रांची जूळवा-जूळव करावी : शिक्षणाधिकारी माधव सलगर 

दहावीची परीक्षा संपली आता 11 प्रवेशासाठी ; कागदपत्रांची जूळवा-जूळव करावी : शिक्षणाधिकारी माधव सलगर

राज्य प्रतिनिधी :- इयत्ता 10 वीची परीक्षा 18 मार्च रोजी संपली आहे. दहावीच्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांना आता पुढील महत्त्वाचा टप्पा म्हणजे इयत्ता 11 वीसाठी प्रवेश घेणे. मागील वर्षापासून राज्यभर इयत्ता 11 वीचे प्रवेश हे ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेद्वारे झालेले होते. त्यानुसारच यंदा देखील सन 2026-27 साठी इयत्ता 11 वीचे प्रवेश ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेद्वारेच होणार आहेत. त्यामुळे इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी प्रवेश प्रक्रिया सूरू होण्यापूर्वी कागदपत्रांची जूळवा-जूळव करुन घेणे व आवश्यक पूर्व तयारी करण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी माध्यमीक माधव सलगर यांनी केले आहे.

येत्या काही कालावधीत इयत्ता 11 वीची प्रवेश प्रक्रियेच्या अनुषंगाने नवीन पोर्टल कार्यान्वित होणार असून याद्वारे कॉलेजचे रजिस्ट्रेशन करणे, शाखा व विषयांची नोंदणी करण्याचे काम कॉलेजला करावयाचे असून त्यानंतर लगेचच विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करण्यासाठी पोर्टल कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे कॉलेज प्रशासन व विद्यार्थ्यांनी पूर्वीच पूर्वतयारी करुन आवश्यक कागदपत्रांची जूळवा-जूळव करुन ठेवावी, जेणेकरुन ऐनवेळी धावपळ होणार नाही व वेळेत रजिस्ट्रेशनचे काम पूर्ण होईल, असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी माधव सलगर यांनी केले आहे.

नांदेड जिल्हयात मागील वर्षी 256 कॉलेजमधून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली होती. यंदा देखील त्या सर्व कॉलेजमधून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यामुळे कॉलेज प्रशासनाने पुढील कागदपत्रे पूर्वीच तयार करुन ठेवावीत.

कॉलेज प्रशासनाने करावयाची पूर्वतयारी कॉलेज मान्यतेचे सर्व आदेश· अतिरिक्त तुकडी, शाखा, विषय मान्यतेचे सर्व आदेश माध्यमाच्या उल्लेखासह असलेले खाते मान्यता आदेश मंडळ मान्यता आदेश सन 2024-25 ची संचमान्यता व तुकडीनिहाय मंजूर प्रवेश क्षमता संख्या

 कॉलेजचे बँक डिटेल्स, अल्पसंख्यांक दर्जा प्राप्त असल्यास आदेश· उपलब्ध भौतिक सुविधा अभिलेखे· फी स्ट्रक्चर मान्यतेबाबत शाळा व्यवस्थापन समितीचा ठराव इतर आवश्यक कागदपत्रे

विद्यार्थ्यांनी व पालकांनी करावयाची पुर्वतयारी, दहावीचे गुणपत्रक· शाळा सोडल्याचा दाखला / बोनाफाईड· डोमिसाईल प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र ( लागू असल्यास) नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र ( लागू असल्यास) ईडब्लूएस प्रमाणपत्र ( लागू असल्यास), दिव्यांग विद्यार्थी प्रमाणपत्र ( लागू असल्यास) · खेळाडू असल्यास प्रमाणपत्र ( लागू असल्यास)

 फोटो. सर्व कॉलेज प्रशासन, विद्यार्थी, पालकांनी वरीलप्रमाणे पूर्वीच सर्व कागदपत्रांची जूळवाजूळव केली तर ऐनवेळी कोणतीही धावपळ होणार नाही, असे आवाहन शिक्षणाधिकारी माधव सलगर यांनी केले आहे.

000000

संबंधित पोस्ट

अधिकारी -‌ कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणातील सूचनांचे काटेकोरपणे पालन करत जबाबदारी दक्षतेने पार पाडावी – निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते-जनगणना २०२७ संदर्भातील जिल्हास्तरीय प्रशिक्षणास प्रारंभ…

नवी मुंबई महानगरपालिकेची पाणीपट्टी वसुलीत ऐतिहासिक कामगिरी !आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये तब्बल 112 कोटींची पाणीपट्टीची वसुली

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ७० व्या #महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी मुंबईत अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने नियोजन करावे, असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे.

vishwatmaklokswamivarta

🎉 जालना महानगरपालिकेचा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा

लखपती दीदी अभियानाच्या वाढीव लक्षांकपूर्तीसाठी बचतगटांच्या व्यापक सहभागावर भर द्यावा – मंत्री जयकुमार गोरे

मुंबईतील विसर्जनची प्रमुख आकर्षणं- आज अनंत चतुर्दशीला मुंबईकरांकडून लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप…

vishwatmaklokswamivarta