vishwatmaklokswamivarta
Breaking News

ज्योतिबाच्या नावानं चांगभलं शिक्षणाच्या नावाने चांगभलं धारावीत जनजागृती आवाज..

ज्योतिबाच्या नावानं चांगभलं शिक्षणाच्या नावाने चांगभलं धारावीत जनजागृती आवाज..

[ मुंबई प्रतिनिधी-

स्त्री शिक्षणाचे उद्धार करते सामाजिक परिवर्तन घडवणारे जातीव्यवस्थेविरुद्ध प्रखर लढा उभारणारे स्वतःच्या पत्नीपासून इतरांना साक्षर करणारे क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले यांची 199 वी जयंती धारावीतील सेवा संघात समाज मंदिरात दिनांक 11 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी चार ते सहा या वेळात महात्मा फुलेंच्या प्रतिभेला पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली

स्थानिक ज्येष्ठ नागरिक श्रीमती अनुसया माने यांनी फुले दाम्पत्य व स्त्रियांच्या चळवळीबद्दल माहिती देऊन मार्गदर्शन केले त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते श्री दिलीप गाडेकर यांनी डॉक्टर आंबेडकर व महात्मा फुले यांच्या चळवळीतील चर्मकार समाजाच्या स्वर्गीय गुणाबाई गाडेकर व सावित्रीबाई बोराडे यांच्या काळातील संघर्षातील कथा व माहिती उपस्थित जनसमुदायाला करून दिली

शेवटी बहुजन चळवळीतील श्री सुनील पवार यांनी फुले शाहू आंबेडकर व शिक्षण सहभागाबद्दल समाजाने दाखविलेली उदासीनता व सध्याच्या स्थितीत शिक्षणामुळे झालेली प्रगती यावर माहिती दिली शेवटी श्री शंकर बळी यांनी आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या लोकांचे व महाराष्ट्र केलेल्या वक्त्यांचे आभार मानते

समारोपप्रसंगी जोतिबाच्या नावाने चांगभलं शिक्षणाचे नावाने चांगभलं असा संदेश देत सर्वांना महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जन्मदिनानिमित्त गोड गोड लाडू ची वाटप करण्यात आले याकरिता श्रीमती आरती राजू माने यांचे सहकार्य लाभले असल्याची माहिती समाजसेवक दिलीप गाडेकर यांनी दिली

 

संबंधित पोस्ट

वीडियो : बढ़ती उम्र के साथ शरीर और Joints में तकलीफ शुरू होती है |

kya aapke office main garba pagalu hain..mentioned them in comment #shorts #navratri #navratristatus

Beautiful & Gorgeous Jahnvi Kapoor at GYM in BANDRA | #newsreach #JanhviKapoor

VTV Gujarati NewsReach Testimonial

When manager asked to come on saturday !!!

Team ki feelings ka bhi toh khayal rakhna padta hai. 🤭😂.