vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अमरावती विभागातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ बंधनकारकविभागीय आयुक्त नयना गुंडे यांचे प्रशासनाला निर्देश

 अमरावती विभागातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ बंधनकारकविभागीय आयुक्त नयना गुंडे यांचे प्रशासनाला निर्देश

बुलढाणा, प्रतिनिधी: भविष्यकालीन संभाव्य दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि भूजल पातळीत वाढ करण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाच्या ‘कॅच द रेन’ अभियानांतर्गत अमरावती विभागातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ (पावसाचे पाणी साठवणूक व्यवस्था) यंत्रणा उभारणे बंधनकारक करण्याचे महत्वपूर्ण निर्देश, विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी प्रशासकीय यंत्रणेला दिले आहेत       केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘कॅच द रेन’ कार्यक्रमांतर्गत जलसंधारण कामांची आढावा बैठक श्रीमती गुंडे यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडली. या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. विभागातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, मनपा आयुक्त आणि संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे या बैठकीत उपस्थित होते.

     पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवणे ही काळाची गरज असून, प्रशासनाने या कामास सर्वोच्च प्राधान्य देऊन विहित मुदतीत ही कामे पूर्ण करावीत, असे श्रीमती गुंडे यांनी स्पष्ट केले.अमरावती विभागातील अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांतील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये तसेच शैक्षणिक संस्थांच्या इमारतींवर तातडीने ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा’ कार्यान्वित करण्याचे आदेश त्यांनी बैठकीत दिले .या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच अमरावती आणि अकोला महानगरपालिकेच्या आयुक्तांनी आपल्या कार्यक्षेत्रात विशेष मोहीम राबवून कामांचा नियमित आढावा घ्यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

       जलसंधारणाचे काम केवळ शासकीय यंत्रणेपुरते मर्यादित न राहता ती एक लोकचळवळ व्हावी, यासाठी नागरिकांनी, स्वयंसेवी संस्थांनी आणि गृहनिर्माण सोसायट्यांनी आपापल्या घरांवर व परिसरात रेन वॉटर हार्वेस्टिंग करून जलसंचयात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही श्रीमती गुंडे यांनी केले.

००००

संबंधित पोस्ट

सांस्कृतिक कार्य विभागाकडून दुष्काळग्रस्त भागात रोजगारनिर्मिती आणि जलसंवर्धन-सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांची घोषणा• बारवांचे पुनरुज्जीवन• संरक्षित स्मारकांच्या देखभालीतून रोजगार• लोककलावंताना मदत होईल असेच कार्यक्रम करणार• दुष्काळासाठी मदत करणाऱ्यांना रवींद्र नाट्यमंदिर मोफत• सांस्कृतिक कार्यक्रमांचा २५ कोटी निधी बारवांसाठी वळवणार

इस्राईल येथे रोजगाराची संधी उपलब्ध

राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांचा जिल्हा दौरा

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित; पुढील अधिवेशन २२ जून रोजी मुंबईत

कामगार भवनात कामगारांसाठींच्या सेवा एकाच छताखाली – पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर कामगार भवनचे भूमिपूजन

वेदांत बंडगर हत्या प्रकरणी कुणाचीही गय नाही, आरोपींना मकोका लावणार- पालकमंत्री चंद्रकांत पाटील