vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

अलिबाग येथे दि.07 सप्टेंबर रोजी डाक अदालतीचे आयेाजन

अलिबाग येथे दि.07 सप्टेंबर रोजी डाक अदालतीचे आयेाजन

रायगड-अलिबाग,:- अधीक्षक डाकघर, रायगड विभाग यांच्या कार्यालयामार्फत दि.07 सप्टेंबर 2026 रोजी, दुपारी ठीक दुपारी 03.00 वा.डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक ग्राहकांनी आपली तक्रार 2 प्रतींमध्ये, अधीक्षक डाकघर, रायगड विभाग, अलिबाग यांच्याकडे दि.03 सप्टेंबर 2026 पर्यंत पोहोचेल अशा रीतीने पाठवावी,असे आवाहन अधीक्षक डाकघर रायगड विभाग अलिबाग राजेश रनाळकर यांनी केले आहे.

रायगड विभागातील डाक सेवेसंबंधित ज्या तक्रारी/समस्या 6 आठवड्यांच्या कालावधीत निकाली काढण्यात आलेल्या नाहीत, अशा टपाल, स्पीड पोस्ट, काऊंटर सेवा, बचत बँक, मनीऑर्डर इत्यादी सेवांशी संबंधित तक्रारींचा डाक अदालतीमध्ये विचार करण्यात येईल. तक्रारीमध्ये सविस्तर माहिती जसे की तक्रारीचा दिनांक, ज्या अधिकाऱ्याकडे मूळ तक्रार दाखल केली त्या अधिकाऱ्याचे नाव व हु‌द्दा इत्यादी माहिती असणे आवश्यक आहे.

विशेष नोंदः त्रैमासिक होणारी डाक अदालत आता दरमहा होणार आहे. दि. 07 सप्टेंबर 2026 रोजी आयोजित करण्यात येणारी डाक अदालत ही या उपक्रमाची प्रथम डाक अदालत असेल. त्यानंतर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी दुपारी 03.00 वाजता डाक अदालत आयोजित करण्यात येईल, ज्या महिन्यात पहिल्या समोवारी पब्लिक हॉलिडे येईल त्या महिन्यात दुसऱ्यादिवशी डाक अदालत घेतली जाईल. याचे स्वतंत्र वेळापत्रक दिले जाईल याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

 

0000000

संबंधित पोस्ट

अनुसुचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा, बदनापूर येथेशैक्षणिक वर्ष सन 2026-27 प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

संभाव्य पूरस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासन सज्ज- जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- सांगलीत कृष्णाकाठी आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम संपन्न

जालना यांच्या वतीने राज्यस्तरीय विज्ञान निबंध लेखन स्पर्धा – २०२६ आयोजित

सांगलीच्या जिल्हाधिकारीपदी डॉ. मैनाक घोष रुजू-मावळते जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची पदोन्नतीने बदली

vishwatmaklokswamivarta

ग्रंथ हे मनुष्याचे सच्चे मित्र – राज्यपाल आचार्य देवव्रत ‘घोस्ट्स, हॉरर अँड हिल्स’ कथासंग्रहाचे प्रकाशन

vishwatmaklokswamivarta

मागासवर्गीयांच्या आर्थिक विकासासाठी विविध कर्ज योजना; पात्र लाभार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन*