vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

अवैध गौण खनिज वाहतुकीवर कारवाई*निंभा येथे पहाटे ५.१५ वाजता कारवाई*वाळूसह ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध गौण खनिज वाहतुकीवर कारवाई*निंभा येथे पहाटे ५.१५ वाजता कारवाई*वाळूसह ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

अमरावती, प्रतिनिधी: भातकुली येथे अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात महसूल विभागाने कारवाई केली आहे. निंभा येथे रविवारी, दि. 22 नोव्हेंबर रोजी सकाळी ५.१५ वाजताच्या सुमारास कारवाई केली. या कारवाईत अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करून वाळूसह अंदाजे ६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.परिविक्षाधीन उपविभागीय अधिकारी महेश घाटोळे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. गेल्या २२ दिवसांच्या कालावधीत भातकुली महसूल विभागाने ही पाचवी कारवाई केली आहे.

जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या निर्देशानुसार तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली भातकुली महसूल विभाग अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीवर लक्ष ठेवत आहे. या कारवाईत तहसीलदार अक्षय मांडवे, मंडळ अधिकारी संतोष धुर्वे, ग्राम महसूल अधिकारी संतोषसिंग गिल व ग्राम महसूल अधिकारी मनोज बेले यांनी सहभाग नोंदविला

अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात महसूल विभागाची मोहीम यापुढेही सुरू राहणार असून, अशा प्रकारच्या अवैध कृत्यांमध्ये सहभागी असणाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे महसूल विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

00000

संबंधित पोस्ट

इंटर एनसीसी ग्रुप स्पोर्ट्स शूटिंग स्पर्धेला उत्साहात प्रारंभ

*श्री तुळजाभवानीदेवीच्या ४ हजार एकर जमीन महाघोटाळ्याची सखोल चौकशी करण्याचे महसूलमंत्र्यांचे जिल्हाधिकार्‍यांना निर्देश !* – महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या पाठपुराव्याला यश…

जिल्ह्यात तातडीने पंचनामे सुरू करावेत – जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

विशेष लेख-सेवा संकल्पातून लोकाभिमुख प्रशासन महिनाभराचा उपक्रम ; प्रशासन जनतेच्या दारी

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात ‘पोकरा’ अंतर्गत कृषी अवजार बँकेसाठी आर्थिक सहाय्य; 5 एप्रिलपर्यंत अर्जाचे आवाहन

शिकाऊ व पक्की अनुज्ञप्तीसाठी शिबिर